मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील (IPL 2022) दुसरा डबल हेडर शनिवारी (२ एप्रिल) खेळला जाणार आहे. डबल हेडर म्हणजेच एका दिवशी दोन सामने. शनिवारी पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरुवात होणार असून त्यापूर्वी दुपारी ३ वाजता नाणेफेक झाली.
डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यातील नाणेफेक मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
तसेच या सामन्यासाठी (MI vs RR) मुंबई इंडियन्सने अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव संघात दाखल झाला होता, त्यामुळे अनेकांना तो अंतिम ११ जणांमध्ये खेळेल असे अपेक्षित होते. मात्र, त्याला मुंबईने राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर ठेवले आहे.
त्याचबरोबर राजस्थानने अंतिम ११ जणांच्या संघात एक बदल केला असून नॅथन कुल्टर-नाईल ऐवजी नवदीप सैनीला संधी दिली आहे. याव्यतिरिक्त कोणताही बदल राजस्थानने केलेला नाही.
A look at the Playing XI for #MIvRR
Live – https://t.co/lPXtk37wjj #MIvRR #TATAIPL pic.twitter.com/G6wqXzCYPj
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2022
असे आहेत ११ जणांचे संघ (Playing XI) –
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL2022| गुजरात वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
…म्हणून विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची ट्रॉफी परत लंडनला पाठविण्यात आली
अभिमानास्पद! विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताची जीएस लक्ष्मीवर मोठी जबाबदारी, वाचा सविस्तर