---Advertisement---

आयपीएलचे साखळी सामने महाराष्ट्रात, तर प्लेऑफचे सामने होणार ‘या’ मैदानावर; ‘माही’ची असणार शेवटची आयपीएल?

MS-Dhoni
---Advertisement---

आयपीएलच्या १५ व्या हंगामातील (IPL 2022) स्पर्धेच्या महत्त्वाच्या तारखा आणि गटवारीची घोषणा झाली आहे. गुरुवारी (२४ फेब्रुवारी) आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत स्पर्धेच्या महत्त्वाच्या तारखांबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२२ चा पहिला सामना २६ मार्चला, तर अंतिम सामना २९ मेला खेळला जाईल. १० आयपीएल संघांचे ७० सामने महाराष्ट्रातच खेळवले जातील. यासाठी मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) ही दोन ठिकाणे निवडण्यात आली असून ४ मैदानांवर हे सामने पार पडणार आहेत. प्लेऑफचे ४ सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. या आयपीएल हंगामात ५ मोठ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या लेखात आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

भारतात खेळवले जाणार सामने
कोरोनामुळे आयपीएल २०२०चा संपूर्ण हंगाम युएईमध्ये खेळवला गेला होता. त्यानंतर आयपीएल २०२१ च्या हंगामाचा पहिला टप्पा भारतात, तर दुसरा टप्पा युएईत पार पडला. यावर्षी आता पुन्हा एकदा सर्व सामने देशातच पार पडणार आहेत. ही भारतासाठी मोठी बाब आहे.

१० संघामध्ये पाहायला मिळणार लढत
यावर्षीच्या आयपीएलमध्ये १० संघ खेळणार आहेत. याआगोदर २०११ मध्ये एकदा १० संघ आयपीएलमध्ये सहभागी झाले होते. यावेळी संघ दोन गटात विभागला गेला आहे. पहिल्या गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे ५ संघ असतील, तर दुसऱ्या गटात चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ असतील. या सर्व संघांना पूर्वीप्रमाणे प्रत्येकी १४-१४ सामने खेळावे लागणार आहेत. एकूण सामन्यांची संख्या ६० वरून ७४ झाली आहे.

मुंबई इंडियन्सला होणार फायदा
आयपीएलचे ७० साखळी सामने मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त ४ ठिकाणी सामने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा फायदा मुंबई इंडियन्स संघाला होऊ शकतो. वानखेडे स्टेडियम हे मुंबईतील मैदान आहे. मुंबईला तेथे सर्व संघांप्रमाणे फक्त ४ सामने खेळायचे आहेत. चाहत्यांमुळे संघाला देशांतर्गत पाठिंबाही मिळणार आहे.

खेळाडूंचा मेगा लिलाव
आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला केला होता. खेळाडूंचा लिलाव होण्याची ही शेवटची वेळ होती. अनेक फ्रँचायझींनी यावर अगोदरच प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्व संघांची स्वतःची अकादमी आहे. ती स्वतः खेळाडूंना तयार करते. अशा स्थितीत त्यांना ड्राफ्टसारखा नियम हवा आहे, ज्यामुळे ते खेळाडूंना बहुतांश काळ संघात ठेवू शकतील. हा नियम ‘द हंड्रेड’ स्पर्धेत लागू आहे.

एमएस धोनीची शेवटची स्पर्धा?
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेला ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळाले आहे. ४० वर्षीय धोनीला लिलावात १२ कोटी मिळाले. रवींद्र जडेजाला सर्वाधिक १६ कोटी मिळाले. अशा स्थितीत सध्याचा हंगाम हा त्याचा शेवटचा हंगाम ठरू शकतो. अगोदर त्याने घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळायचा असल्याचे सांगितले होते, पण १५ व्या हंगामात सीएसकेला घरच्या मैदानात एकही सामना खेळायला मिळणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

संधीचे सोने! तब्बल ९७ सामन्यानंतर कसोटी पदार्पणाची संधी मिळेलेल्या फलंदाजाचा न्यूझीलंडविरुद्ध शतकी तडाखा

द्रविड-गांगुलीसोबतली चर्चा उघड करणे वृद्धिमान सहाला पडणार महागात? बीसीसीआय घेऊ शकते मोठा निर्णय

‘कर्णधार’ रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून होणार मोठा सन्मान, कारणही आहे खास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---