आयपीएल फ्रँचायजी पंजाब किंग्स संघाला आगामी हंगामासाठी नवीन कर्णधार मिळाला आहे. मयंक अगरवालने पंजाबचे कर्णधारपद स्वीकारले आहे. मयंकच्या मते त्यांच्याकडे आयपीएलचे विजेतेपद पटकावण्यासाठी सक्षम संघ आहे. मयंक संघासोबत चार हंगाम राहिल्यानंतर त्याला पहिल्यांदा संघाचे कर्णधारपद सोपवले गेले आहे.
मागच्या दोन आयपीएल हंगामामध्ये मयंक अगरवाल (Mayank Agarwal) ४०० पेक्षा अधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. मागच्या हंगामानंतर केएल राहुलने पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाची साथ सोडली आणि मयंकवर कर्णधारपदाची जबाबदारी येऊन पडली. राहुल आणि मयंक यांनी संघाला चांगली सुरुवात दिली, परंत तरीही त्यांचा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकला नाही. अगरवाल म्हणाला, “आमच्याकडे जेतेपद जिंकण्यासाठी सक्षम संघ आहे. आता खेळाडूंना दबावाच्या परिस्थितीत त्यांची गुणवत्ता दाखवावी लागेल.”
मयंक अगरवालच्या मते पंजाब किंग्जने मेगा लिलावात त्यांना ज्या खेळाडूंची गरज होती, त्यांना खरेदी केले आणि सध्या त्यांचा संघ संतुलित आहे. तो म्हणाला की, “एक संघाच्या रूपात आम्ही (मेगा) लिलावात चांगले प्रदर्शन केले. आम्हाला माहिती होते की, स्पर्धा मुंबईत खेळली जाईल, त्यामुळे त्याच आधारावर संघ निवडला गेला. आम्ही खुश आहोत की, आमच्याकडे संतुलित संघ आहे.”
मयंक अगरवाल पहिल्यांदा कर्णधारपद सांभाळत असला, तरी तो त्याचा दबाव घेणार नाहीय. कर्णधारपदाची भूमिका महत्वाची असली, तर त्याचा फलंदाज मयंकच्या फलंदाजीवर दिसणार नाही, असे त्याने स्वतः स्वष्ट केले. शिखर धवनसारखा दिग्गज संघात असताना मयंकला ही जबाबदारी दिली गेली आहे.
https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1505166851101319171
“जेव्हा मी फलंदाजी करत असेल, तेव्हा मी फक्त एक फलंदाजच आहे. आमच्याकडे अनेक नेतृत्व करण्यायोग्य आणि अनुभवी खेळाडू आहेत, ज्यामुळे माझे काम सोपे झाले आहे. मी एका फलंदाजाच्या रूपात चांगले प्रदर्शन करू इच्छितो. आता फलंदाजी क्रमाविषयी काही सांगता येत नाही. परंतु शिखर धवन संघात सहभागी झाल्यामुळे उत्साहित आहे,” असे तो पुढे बोलताना म्हणाला.






