आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव (IPL 2022 mega auction) १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये पार पडला. यावर्षी लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ स्पर्धेत सहभागी होणार असल्यामुळे लिलाव अधिक रंजक झाला. भारताचा माजी दिग्गज सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) लखनऊ संघाचा मेंटॉर बनला आहे. मेगा लिलावात लखनऊ सुपरजायंट्सला एक खेळाडू खूपच स्वस्तात मिळाला आहे, जो यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जमध्ये सहभागी होता. संघाचा मेंटॉर गंभीरने याविषयी माहिती दिली आहे.
युवा अष्टपैलू खेळाडू कृष्णाप्पा गौतम (Krishnappa Gautham) हाच तो खेळाडू आहे, जो लखनऊ सुपर जायंट्सला मेगा लिलावात खूपच स्वस्तात मिळाला आहे. गौतम गंभीरच्या मते कृष्णाप्पा एवढ्या स्वस्तात मिळेल, अशी संघाला अपेक्षा नव्हती. कृष्णाप्पा यापूर्वी अनेक आयपीएल फ्रेंचायझींमध्ये खेळला आहे. राजस्थान रॉयल्ससोबत त्याने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर पंजाब किंग्स मागच्या हंगामात तो चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळला होता. मागच्या हंगामात चेन्नईने त्याच्यासाठी ९ कोटीपेक्षा जास्त बोली लागली होती. परंतु यावर्षी लखनऊने त्याला अवघ्या ९० लाखात विकत घेतले.
स्टार स्पोर्टससोबत बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, “माझ्या हिशोबाने कृष्णाप्पा गौतमला ९० लाखात विकत घेणे एक फायदेशीर डील होती. मागच्या वेळी त्याला ९ कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळाली होती. आमची इच्छा होती की, आठव्या क्रमांकावर आमच्याकडे असा एखादा खेळाडू असावा, जो फलंदाजीही करू शकेल. कारण संघाकडे आधीपासूच कृणाल पांड्या होता. कृष्णाप्पा गौतमला विकत घेऊन आम्ही खूप आनंदी आहोत.”