ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने हल्लीच ऍशेस मालिकेत चांगली दमदार खेळी करत संघाला मालिका जिंकून दिली आहे. तत्पूर्वी टी20 विश्वचषकात तो ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ राहिला होता. परंतु आयपीएल 2021 मध्ये डेव्हिड वॉर्नरची कामगिरी तितकी चांगली राहिली नव्हती. त्यामुळे त्याचा सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात सर्वकाही अलबेल दिसत नव्हते. मात्र त्याने क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धेत दमदार पुनरागमन करत हैदराबाद संघाला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
यानंतर आता डेव्हिड वॉर्नर याने येत्या मेगा लिलावापुर्वी पुन्हा हैदराबादला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. वॉर्नर याला हैदराबाद संघानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. बंगुळूरू येथे 12-13 फेब्रुवारीला आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे.
ऍशेसमधील तिसरी कसोटी जिंकल्यावर हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मुडी यांनी ऑस्ट्रेलिया संघांचे अभिनंदन केले. यावर एका चाहत्याने आगामी लिलावात चांगले खेळाडू घ्यावेत, अशी टीका केली आहे. यानंतर वॉर्नर याने त्यांना उत्तर देत लिहिले की, मला यात शंका आहे. हे उत्तर हैदराबादला टोचले आहे. त्यांनी वॉर्नरला याचे उत्तर दिले आहे.
How about having a good auction for srh tom? Please?
— Rag (@RagV_7) December 28, 2021
https://twitter.com/davidwarner31/status/1475788968201371652?s=20
फ्रँचायझीने लिहिले की, ‘डेव्हिडचे ऍशेस मालिका जिंकल्याबद्दल अभिनंदन. आम्हाला वाटते की तुम्ही फॉर्ममध्ये आहात आणि त्याचा आनंद घेत आहात. त्याचवेळी,आम्हाला आशा आहे की तुमचा लिलाव चांगला होईल.’
https://twitter.com/SunRisers/status/1475800207287717890?s=20
आयपीएल 2021 मध्ये हैदराबाद संघाला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात त्यांनी 6 पैकी 5 सामने गमावले आणि संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी राहिला होता. चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या पराभवानंतर फ्रँचायझीने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला होता. वॉर्नरच्या जागी न्यूझलंडचा केन विल्यमसन याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. परंतु विलियम्सनच्या नेतृत्त्वाखालीही संघ चांगला खेळू शकला नाही.
आयपीएलनंतर वॉर्नर याने टी20 विश्वचषक आणि ऍशेस मालिकेत दमदार खेळी केली आहे. त्यामुळे 2022 आयपीएल मध्ये त्याच्यावर अहमदाबाद फ्रँचायझीची नजर असेल, असे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रणजी ट्रॉफीसाठी तमिळनाडू संघाच्या नेतृत्त्वाची धुरा विजय शंकरकडे, ३ नव्या चेहऱ्यांनाही संधी
हेही पाहा-