---Advertisement---

भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्टार क्रिकेटर क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटला केला अलविदा

quinton de kock 2
---Advertisement---

नुकताच दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्या सेंच्यूरियन येथे पहिला कसोटी सामना पार पडला आहे. या सामन्यात पाहुण्या भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेला ११३ धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याने मोठे पाऊल उचलले आहे. त्याने गुरुवारी रोजी (३० डिसेंबर) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने यासंबंधी माहिती देताना लिहिले आहे की, ‘यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने त्याच्या वाढत्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याच्या हेतूचा हवाला देत तत्काळ प्रभावाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.’ त्याच्या या तडकाफडकी निर्णयाने क्रिकेटविश्वात मात्र खळबळ उडाली आहे.

२९ वर्षीय डी कॉकने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे आनंदाची बातमी दिली होती. डी कॉक लवकरच बाबा होणार आहे. तो आणि त्याची पत्नी साशा डी कॉक यांच्या आयुष्यात लवकरच तिसऱ्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. याचमुळे आपण कसोटी क्रिकेटला रामराम ठोकत असल्याचे कारण त्याने दिले आहे.

आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल क्रिकेट दक्षिण आफ्रिकेशी बोलताना डी कॉक म्हणाला की, “माझ्यासाठी हा निर्णय घेणे मुळीच सोपे नव्हते. मी बराच वेळ माझ्या भविष्यावर विचार केला आणि सध्या माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टीला अधिक प्राधान्य द्यावे, हे पाहिले. लवकरच मी आणि साशा आमच्या पहिल्या बाळाचे या जगात स्वागत करणार आहोत. थोडक्यात आमचे कुटुंब वाढणार आहे. माझ्यासाठी माझे कुटुंबच सर्वस्व आहे आणि म्हणूनच मला त्यांना देण्यासाठी पुरेसा वेळ हवा आहे. माझ्या आयुष्यातील या नव्या आणि औत्सुक्याने भरलेल्या टप्प्यात मला माझ्या कुटुंबात राहायचे आहे.”

दुसरीकडे डी कॉकला भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात साजेसे प्रदर्शनही करता आले नव्हते. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ३४ धावा तर दुसऱ्या डावात २१ धावांची खेळी केली होती. यानंतर आता कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यात त्याची जागा कोणता खेळाडू घेईल, हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

मेगा लिलावापूर्वी वॉर्नर अन् हैदराबादमध्ये छेडले ट्वीटर वॉर, अखेर फ्रँचायझीच्या उत्तराने क्रिकेटरची बोलती बंद

बिग ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्टार क्रिकेटर क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटला केला अलविदा

रणजी ट्रॉफीसाठी तमिळनाडू संघाच्या नेतृत्त्वाची धुरा विजय शंकरकडे, ३ नव्या चेहऱ्यांनाही संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---