यावर्षी आयपीएलचा (IPL 2022) १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारीला बीसीसीआयने मेगा लिलाव आयोजित केला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. तर काही युवा खेळाडूंनीही करोडो रुपयांची कमाई केली. कोलकाना नाईट रायडर्सने अनकॅप्ड खेळाडू शिवम मावी (shivam mavi) याला संघात सामील केले. मावीसाठी केकेआरने मेगा लिलावात ७.२५ कोटी रुपये खर्च केले.
युवा अष्टपैलू शिवम मावीचे नाव लिलावासाठी जेव्हा समोर आले, तेव्हा संघ त्याला विकत घेण्यासाठी इच्छुक दिसत होते. मावीची बेस प्राइस ४० लाख रुपये होती. रॉयल चॅलेंजर्स बेगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्सने यांनी त्याच्यावर बोली लावायला सुरुवात केली. पण नंतर पंजाब, गुजरात आणि लखनऊ हे संघही त्याच्यावर बोली लावू लागले. परंतु केकेआरने पैशांचा कसलाच विचार न करता त्याला ७.२५ कोटी रुपायंमध्ये त्याला पुन्हा एकदा संघात सामील केले. मागच्या हंगामापर्यंत त्याने केकेआरचेच प्रतिनिधित्व केले होते.
मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी केकेआरने ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सला (pat cummins) ७.२५ कोटीमध्ये विकत घेतले. श्रेयस अय्यरला (shreyas iyer) संघात सामील करण्यासाठी केकेआरने तब्बल १२.२५ कोटी खर्च केले. या दिग्गजांच्या यादीत ७.२५ कोटी रुपये घेऊन आता मावीही सहभागी झाला आहे.
दरम्यान, मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने प्रत्येक आयपीएल फ्रेंचायझीला चार खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली होती. काही फ्रेंचायझींनी चार, काहींनी तीन तर काहींनी दोन खेळाडूंना रिटेन केले. केकेआरने मागच्या हंगामतील चार महत्वाच्या खेळाडूंना रिटेन केले होते. यामध्ये वेस्ट इंडीजचा दिग्गज आंद्रे रसल (१२ कोटी रुपये), वरुण चक्रवर्ती (८ कोटी), वेंकटेश अय्यर (८ कोटी) आणि सुनील नरीन (६ कोटी) यांचा समावेश होता. केकेआरसाठी महागात पडलेला शिवम मावी आगामी आयपीएल हंगामात काय कमाल करतो, हे सर्वांनाच पाहायचे आहे.
महत्वाच्या बातम्या –
IPL लिलावात लखनऊचा नवाबी अंदाज! आवेश खानवर लावली विक्रमी बोली, ठरला ऐतिहासिक खेळाडू
‘मुंबईकर’ बनला ‘बेबी एबी’! कोट्यावधींची किंमत घेत बनला पलटनचा भाग