---Advertisement---

मुंबईने घडविलेल्या ‘या’ गोलंदाजाला केकेआरने केले आपल्या ताफ्यात सामील

On: रविवार, फेब्रुवारी 13, 2022 10:35 PM
---Advertisement---

आयपीएल २०२२ (IPL 2022) साठी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोरमध्ये मेगा लिलाव (IPL mega auction) आयोजित केला. यावर्षी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ सहभागी होणार आहेत. मेगा लिलावात अनेक दिग्गज सहभागी झाले होते. त्याचसोबत युवा खेळाडूंनीही कोट्यावधी रुपये कमावले. कोलकाता नाइट रायडर्सने लिलावादरम्यान जम्मू कश्मीरचा युवा गोलंदाज रसिक सलाम दार याला त्याची बेस प्राईस २० लाखात विकत घेतले.

लिलावात जेव्हा रसिक दारचे नाव आले, तेव्हा केकेआरव्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. यापूर्वी रसिक मुंबई इंडियन्सकडून खेळल आहे. रसिकचे नाव जेव्हा कधी घेतले जाते, तेव्हा त्याच्याशी संबंधीत एका वादाचा नक्कीच उल्लेख होतो. त्याने स्वतःचे वय कमी दाखवण्यासाठी ओळखपत्रावर चूकीची जन्मतारीख लिहीली होती. याच प्रकरणात त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली गेली होती. त्याच्यावर आरोप होता की, २०१९ मध्ये त्याने ओळखपत्रावरील जन्मतारखेशी छेडछाड करून वय १७ वर्ष सांगितले होते. परंतु त्यावेळी त्याचे खरे वय १९ वर्ष होते. त्याचा जन्म ५ एप्रिल २००० मध्ये झाला असून चालू वर्षी तो वयाची २२ वर्षा पूर्ण करणार आहे.

आयपीएलमध्ये खेळण्याची रसिकची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१९ मध्ये तो आयपीएल स्पर्धेत खेळला होता. त्या वर्षी तो मुंबई इंडियन्ससाठीच खेळलेला. त्या संपूर्ण हंगामात त्याला मुंबई संघाने फक्त एका सामन्यात खेळवले होते आणि यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. बंदीच्या कालावधीत मुंबई फ्रेंचायझीने त्याला जम्मु कश्मीरमधून मुंबईत बोलवले आणि त्याठिकाणी त्याने क्लबमध्ये सराव केला. तसेच स्थानिक क्रिकेट स्पर्धेत सहभागही घेतला होता. मागच्या आयपीएल हंगामात मुंबईने त्याला नेट गोलंदाजाच्या रूपात संघात सामील केले होते. संघासोबत तो यूएईमध्येही गेला होता. मेगा लिलावात त्याचे नाव येताच केकेआरने त्याच्यावर बोली लावली आणि संघात सामील केले.

महत्वाच्या बातम्या –

अगग! बोल्टच्या रिप्लेसमेंटसाठी मुंबईने खर्च केले ८ कोटी, पण वेगवान गोलंदाज पूर्ण हंगाम असेल अनुपलब्ध?

आरसीबीचा फायद्याचा सौदा! ‘या’ प्रतिभाशाली किवी फलंदाजाला ८० लाखांमध्ये घेतले संघात

न्यूझीलंडच्या २ बहिणी टीम इंडियावर पडल्या भारी, ६२ धावांनी पहिली वनडे जिंकत मालिकेचा केला शुभारंभ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---