आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव पार पडला. मेगा लिलावात सहभागी असलेल्या सर्व १० संघांनी त्यांच्या त्यांच्या रनणीतीनुसार खेळाडूंवर बोली लावली आणि खेळाडूंना संघात सामील केले. परंतु, लिलावादरम्यान तीन मुलींची सर्वत्र चर्चा झाली, ज्या खेळाडूंवर बोली लावण्याविषयी निर्णय घेत होत्या. या तीन सुंदर चेहऱ्यांविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकाता निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. चला तर जाणून घेऊच्या मेगा लिलावात खेळाडूंवर बोली लावणाऱ्या या तीन सुंदर चेहऱ्यांविषयी.
१. काव्या मारन (Kavya Maran) –
मेगा लिलावादरम्यान आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादच्या टेबलवर बसलेली आणि खेळाडूंवर बोली लावताना दिसणारी ही मुलगी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. या सुंदर मुलीचे नाव आहे काव्या मारन. काव्या मारन सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण आहे. सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिधी मारन यांची ती मुलगी आहे. यापूर्वी तिला अनेक वेळा मैदानात पहिले गेले आहे, जेव्हा ती स्वतःची फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादला प्रोत्साहन देत असायची. आगामी हंगामात देखील ती मैदानात दिसू शकते.
२. सुहाना खान (suhana khan) –
कोलकाता नाइट रायडर्सचा मालक शाहरुख खान मेगा लिलावासाठी उपस्थित नव्हता. परंतु त्याची दोन्ही मुले आर्यन खान आणि सुहाना खान लिलावासाठी उपस्थित होते. या दोघांनी खेळाडूंवर बोली लावण्यासंदर्भात काही महत्वाचे निर्णयही घेतले. आर्यन खान यापूर्वीही मेगा लिलावासाठी उपस्थित राहिला आहे, पण २१ वर्षाची सुहाना पहिल्यांदाच मेगा लिलावासाठी उपस्थित राहिली आहे. सुहाना याआधी प्री ऑक्शनमध्ये दिसली होती.
३. जान्हवी मेहता (janvi mehata) –
बॉलिवुड अभिनेत्री आणि कोलकाता नाइट रायडर्सची सहमालकीण जुही चावलाही मेगा लिलावात दिसली नाही. पण जुहीची मुलग जान्हवी मेहता लिलावासाठी उपस्थित होती. याआधी ती चार वर्षांपूर्वी मेगा लिलावासाठी उपस्थित राहिली होती आणि त्यावेळी तिचे वय १८ वर्ष होते. मेगा लिलावात जान्हवी मेहता आणि सुहाना खान या दोघी मिळून केकेआर संघासाठी खेळाडूंची निवड आणि बोली लावण्यासंदर्भात निर्णय घेताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘पर्पल पटेल’चा वाढला भाव; ज्या आरसीबीने २० लाखांना घेतले होते विकत, त्यांनीच यंदा मोजले ‘इतके’ कोटी
शिमरॉन हेटमायर झाला कोट्यधीश!! आगामी हंगामात ‘या’ संघाचे करणार प्रतिनिधित्व