गुरुवारी (२१ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सची वरची फळी पूर्णपणे अपयशी ठरली. परिणामी सीएसकेने सामन्यात विजय मिळवला. परंतु सीएसकेला हा विजय मिळवण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. सीएसकेचा विजय सोप बनू शकत होता, पण एमएस धोनी आणि रवींद्र जडेजाने केलेल्या चुका संघाला महागात पडल्या. मुंबईच्या डावातील दुसऱ्या षटकात या घटना घडल्या.
सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने यष्टीमागे चूक केल्याचे खूपच कमी वेळा पाहायला मिळाले आहे. परंतु मुंबई इंडियन्सच्या डावाच्या दुसऱ्या षटकात धोनीने एक हातची विकेट सोडली. मुंबईने पहिल्या षटकात दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात देखील त्यांना मोठे यश मिळू शकत होते. परंतु धोनीने या षटकात एक सोपी स्टंपिंग सोडली, ज्यामुळे सूर्यकुमार यादवला जीवनदान मिळाले. यावेळी मिशेल सँटनर गोलंदाजी करत होता आणि षटकातील दुसऱ्या चेंडूवर धोनीच्या हातून ही चूक घडली.
Jadeja Dropping a Catch is like Dhoni Missing a Stumping Chance 🤯#CSKvsMi pic.twitter.com/EJTe2FWTlV
— Tanay (@tanay_chawda1) April 21, 2022
एवढेच नाहीत, तर दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मुंबईचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसला देखील जीवनदान मिळाले. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या ब्रेविसने सँटनरला षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटवर नीट न बसल्यामुळे त्याला विकेट गमवावी लागली. ब्रेविसने मारलेला हा चेंडू कव्हर्स आणि मिड ऑफमध्ये बराच वेळ हवेत होता, पण जडेजाला तो झेलता आला नाही. चेंडू झेलणे लांबच पण जडेजा त्याला स्पर्श देखील करू शकला नाही. झेल सुटल्यानंतर जडेजा विश्वास बसत नव्हता आणि तो प्रिटोरियसवर राग व्यक्त करत होता. या दोन विकेट जर सीएसकेला वेळीच मिळाल्या असत्या, तर त्यांचा संघ काही षटके राखून विजय मिळवू शकत होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक गमावणाऱ्या मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या नुकसनावार १५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीसएकेने डावाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारत विजय मिळवला. धोनीने शेवटच्या षटकाचा सामना केला आणि सीएसकेला हंगामातील त्यांचा दुसरा विजय मिळवून दिला. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सला मात्र त्यांच्या सलग ७व्या सामन्यात पराभव मिळाला. आयपीएलमध्ये हंगामाच्या सुरुवातीचे सलग ७ सामने गमावणारा मुंबई इंडियन्स इतिहासातील पहिला संघ ठरला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित-विराटची विकेट घेणारा कोण आहे मुकेश चौधरी? महाराष्ट्र संघासाठीही केलीय दमदार कामगिरी
मुंबई इंडियन्सच्या चुकांवर सचिनच्या शब्दांचे पांघरुण; म्हणतोय, ‘युवा संघ आहे, चुकांमधून…’