शनिवारी (२१ मे) रात्री दिल्ली कॅपिटल्सला महत्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून मात मिळाली. मुंबईच्या टिम डेविडने पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. त्याने अवघ्या ११ चेंडूत ३४ धावा केल्या आणि विजय सोपा बनवला. डेविड त्याच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता, पण कर्णधार रिषभ पंतने रिव्यू न घेतल्यामुळे तो वाचला. पराभवानंतर पंतने डेविड फलंदाजी करत असताना रिव्यू न घेण्याचे कारण स्पष्ट केले.
टिम डेविड (Tim David) फलंदाजीसाठी आला होता, तेव्हा मुंबई इंडियन्सला विजयासाठी ३३ चेंडूत ६५ धावा पाहिजे होत्या. डेविडने खेळलेला पहिलाच चेंडू बॅटला लागून यष्टीपाठी रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या हातात गेला. किंचित आवाज आल्यामुळे पंतने अपील देखील केली, पण पंचांनी ती अपील फेटाळली. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सकडे रिव्यू शिल्लक होता, पण तरीही पंतने रिव्यू घेतला नाही.
परिणामी डेविडला मिळालेल्या जीवनदानाचा त्याने चांगलाच फायदा करून घेतला. २२ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने त्याने ३४ धावा केल्या. डेविडच्या धमाकेदार खेळीमुळे चेंडू आणि धावांमधील अंतर कमी झाले. मुंबईने शेवटच्या षटकात पाच चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला.
सामना संपल्यानंतर रिषभ पंतने सांगितले की, मैदानात उपस्थित बाकीचे खेळाडू ठाम नसल्यामुळे त्याने रिव्यू घेतला नाही. पंत म्हणाला की, “मला वाटते की, तिथे काहीतरी संपर्क झाला आहे. त्यामुळे मी बाकीच्यांना विचारले की, रिव्यू घेतला पाहिजे का? सर्कलमधील बाकीचे खेळाडू ठाम नव्हते. शेवटी मी रिव्ह्यू घेतला नाही.” अशात अनेकजण दिल्लीचा मिळालेल्या पराभवासाठी पंतचा हा निर्णय कारणीभूत असल्याचे मानत आहेत. परंतु दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पॉंटिंगने यावर स्पष्ट मत व्यक्त केले. पॉंटिंगच्या मते मते त्यांचा संघ फक्त पंतच्या या एका निर्णयामुळे पराभूत झाला नाहीये. पराभवाची इतरही कारणे आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने हे लक्ष्य ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.१ षटकात गाठले. मुंबईने विजय मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्लेऑफमध्ये का पोहोचू शकली नाही दिल्ली? पाहा कर्णधार पंतने काय सांगितलंय कारण
‘आम्ही लयीत यायला उशीर केला, पण…’, रोहितची मुंबईच्या कामगिरीबद्दल मोठी प्रतिक्रिया