आयपीएलच्या १५व्या हंगामातील ५१वा सामना शुक्रवारी (६ मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या षटकात ५ धावांनी विजय मिळवला, तर दुसरीकडे गुजरात टायटन्सला अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार हार्दिक पंड्या १८व्या षटकात, तर राहुल तेवतिया शेवटच्या षटकात धावबाद झाल्यामुळे गुजरातला पराभव मिळाला. सामना गमावल्यानंतर हार्दिकने पराभवाचे कारण स्पष्ट केले.
गुजरात टायटन्सला विजयासाठी शेवटच्या षटकात ९ धावा करणे गरजेचे होते, पण त्यांना या धावा करता आल्या नाहीत. फिनिशर राहुल तेवतिया धावबाद झाल्यामुळे संघाला मोठा फटका बसला आणि पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने शेवटच्या षटकात अवघ्या तीन धावा खर्च केल्या आणि सामना नावावर केला. हार्दिक पंड्याच्या मते शेवटच्या षटकांमध्ये विकेट्स गमावल्यामुळेच त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) म्हणाला की, “मला वाटते की फलंदाजांनी आम्हाला निराश केले. टी-२० सामन्यांमध्ये तुम्ही नेहमी पराभूत होऊ शकत नाही. यासाठी कुणालाच दोषी ठरवले जाऊ शकत नाही. कारण, आम्ही असे सामने जिंकले आहेत. आम्ही चुका केल्या, ज्याचे परिणाम भोगले. आम्ही आमचा डाव १९.२ षटकापर्यंत चांगले खेळलो, एक किंवा दोन हिट शेवटी मारले जाऊ शकत होते. मला हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ द्यायचा नव्हता.”
हार्दिकच्या मते फलंदाजांनी जरी निराशा केली असली, तरी गोलंदाजांचे प्रदर्शन मात्र चांगले होते. मुंबई इंडियन्सने सुरुवात चांगली केली होती, पण गुजरातच्या गोलंदाजांनी २० षटकांमध्ये त्यांच्या ६ विकेट्स घेतल्या आणि १७७ धावांवर रोखले. तो म्हणाला की, “मला वाटते की, गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आणि १७७ धावसंख्येवर रोखले. कारण, त्यांचा संघ २०० धावांच्या दिशेने पुढे चालला होता.”
दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “शेवटी हा सामना रोमांचक झाला होता. आम्ही मोठ्या काळापासून विजयाच्या प्रतिक्षेत होतो, त्यामुळे हा विजय मनाला शांती देणारा होता. आम्ही १५-२० धावा कमी केल्या, त्यांनी चांगली गोलंदाजी केली.”
दरम्यान उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने ६ विकेट्सच्या नुकसानावर १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्स २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावांपर्यंत पोहोचू शकला. त्यामुळे मुंबईला हा सामना ५ धावांनी जिंकण्यात यश आले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकच मारला पण सॉलीड मारला! इशान किशनने तेवतियाला खेचला १०४ मीटरचा षटकार, Video व्हायरल
साई सुदर्शन आयपीएलमध्ये ‘हिट विकेट’ होणारा पहिलाच नाही, ‘हे’ १२ खेळाडूही झालेत असेच आऊट
IPL | अटीतटीच्या लढतीत मुंबईच सर्वांना वरचढ! ‘इतक्यांदा’ मिळवला ५ पेक्षा कमी धावांनी विजय