इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या ५१व्या सामन्यात गुजरात टायटन्ससाठी रिद्धिमान साहा आणि शुबमन गिल या सलामीवीर जोडीने अप्रतिम प्रदर्शन केले. गुजरात टायटन्ससमोर या सामन्यात मुंबई इंडियन्सचे आव्हान होते. अनुभवी रिद्धिमान साहा आणि युवा शुबमन गिलने गुजरात टायटन्ससाठी या सामन्यात आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी केली आहे.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने गुजरातला १७८ धावांचे लक्ष्य दिले. याच लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी गुजरात टायटन्ससाठी चालू हंगामातील आणि इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०६धावांचे योगदान दिले.
https://twitter.com/gujarat_titans/status/1522622398503469056
गुजरात टायटन्सने मागचा सामना ८ एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध खेळला होता. या सामन्यात सलामीवीर शुबमन गिलने साई सुदर्शन (Sai Sudharshan) सोबत १०१ धावांची भागीदारी केली होती, जी संघासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी ठरली होती. परंतु मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात साहा आणि गिल जोडीने हा विक्रम मोडून नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इडियन्सने ६ विकेट्सच्या नुकसानावर १७७ धावा उभ्या केल्या. या धावा करण्यासाठी सलामीवीर रोहित शर्मा (२८ चेंडूत ४३ धावा) आणि ईशान किशन (२९ चेंडूत ४५ धावा) जोडीने महत्वाचे योगदान दिले. सलामीवीरांनी चांगली सुरुवात देऊन देखील संघाचे मध्यक्रमातील फलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. गुजरातच्या गोलंदाजांनी देखील सुरुवातीच्या षटकांमध्ये अधिक धावा खर्च केल्या, पण शेवटाकडे जाताना त्यांचे प्रदर्शन देखील सुधारले.
प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सच्या सलामीवीरांनी देखील मोठी खेळी केली आणि संघाला चांगली सुरुवात दिली. रिद्धिमान साहाने ४० चेंडूत वैयक्तिक ५५ धावा आणि शुबमन गिलने ३६ चेंडूत ५२ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात राहुल तेवतियाकडून चाहत्यांना विजयाच्या अपेक्षा होत्या, पण तो धावबाद झाला आणि गुजरात टायटन्सने ५ धावांच्या अंतराने सामना गमावला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेकॉर्ड ब्रेक मॅच! गुजरात- मुंबई सामन्यामध्ये रचले गेले ‘हे’ ११ विक्रम, टाका एक नजर
‘टेबल टॉपर’वर भारी पडली मुंबई इंडियन्स, गुजरातच्या फलंदाजाच्या नाकी नऊ आणत ५ धावांनी मिळवला विजय
शेवटी रोहितची बॅट तळपलीच! विस्फोटक फलंदाजी करत ‘हिटमॅन’ बनला मुंबईचा दुसरा ‘सिक्सर किंग’






