आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जाणारा मुंबई इंडियन्स संघ खराब फॉर्ममध्ये आहे. सोमवारी (८ मे) चालू हंगामातील खराब प्रदर्शनाचे त्यांनी पुन्हा एकदा प्रदर्शन केले. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्य्या सामन्यात मुंबईने ५२ धावांनी पराभव स्वीकारला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सामना संपल्यानंतर पराभवाचे खापर संघाच्या फलंदाजांवर फोडले.
रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार असलेला संघ मुंबई इंडियन्सने चालू हंगामात खूपच निराशाजनक प्रदर्शन केले आहे. केकेआरविरुद्ध पराभव मिळाल्यानंतर रोहित म्हणाला की, “गोलंदाजी आक्रमणाकडून चांगला प्रयत्न करण्यात आला. बुमराह खास ठरला. आम्ही ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे निराश आहे. फलंदाजांनी खराब फलंदाजी केली. खरतर या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड नव्हते. आम्ही याठिकाणी आमचा चौथा सामना खेळत आहोत आणि आम्हाला माहीती आहे की याठिकाणी काय करायचे आहे. आम्हाला माहीती आहे की, वेगवान गोलंदाजांना खेळपट्टी थोडी अनुकूल असेल. आम्हाला भक्कम भागीदारी करता आली नाही आणि अशा प्रकारच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भागीदारी गरजेची असते.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
केकेआरला अजून कमी धावसंख्येवर रोखणे शक्य होते का? या प्रश्नावर रोहित म्हणाला, “हे शक्य नव्हते. कारण १० षटकांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते खूप पुढे होते. आम्ही उत्कृष्ट गोलंदाजी करून चांगले पुनरागमन केले. बुमराह आणि संपूर्ण गोलंदाजी आक्रमणाचे प्रयत्न चांगले राहिले. फलंदाजांनी निराश केले. हे असेच काहीसे होते, ज्यामध्ये तुम्हाला सुधारणा करायची होती, पण आम्ही ते करू शकलो नाहीत.”
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर तर मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहने १० धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या आणि केकेआरला ९ विकेट्सच्या नुकसानावर १६५ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ विजय मिळवले अशी अपेक्षा होती, पण त्यांना ते जमले नाही. मुंबईच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ एक अशा स्वस्तात विकेट्स गमावल्या आणि ११३ धावांवर सर्वबाद झाले. परिणामी केकेआरने मोठ्या अंतराने सामना जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मुंबई- कोलकाता सामन्यात बनले ‘हे’ ११ विक्रम, जसप्रीत बुमराहने लुटली वाहवा; जाणून घ्या एका क्लिकवर
यशस्वी संघाचं बिरुद मिरवणाऱ्या मुंबईची गाडी आयपीएल २०२२मध्ये रुळावरून खाली! मोडला आपलाच नकोसा विक्रम