इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या २३व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमने-सामने होते. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. कारण, मुंबईने चालू आयपीएल हंगामात अद्याप एकही विजय मिळवलेला नाहीये. पहिल्या चार सामन्यात पराभव पत्करल्यानंतर पहिल्या विजयासाठी मुंबईचा संघ धडपड करताना दिसला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन आणि मयंक अगरवालने पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. यादरम्यान धवनच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद देखील झाली.
नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला (Punjab Kings) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि मयंक अगरवाल (Mayank Agarwal) यांनी पंजाबला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी पार पाडली आणि वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली. या सामन्यादरम्यान धवन मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल इतिहासात सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज बनला. धवनने सुरेश रैना (Suresh Raina) याचा विक्रम मोडून यादीत पहिला क्रमांक गाठला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
धवनने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात वैयक्तिक ७० धावा केल्या. यासाठी त्याने ५० चेंडू खेळले आणि ५ चौकारांसह ३ षटकार मारले. धवन आता मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने मुंबईविरुद्ध आतापर्यंत ८२५ धावा केल्या आहेत. सीएसकेचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना यापूर्वी या यादीत पहिल्या क्रमांकावर होता, जो आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. रैनाने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना ८२४ धावा केल्या आहेत. यादीत तिसऱ्या क्रमांकावर ७८५ धावांसह एबी डिविलियर्स आहे. विराट कोहली ७६९ धावांसह मुंबईविरुद्ध चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
Good show with the bat, time to do it with the ball! 💪🏻#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #MIvPBKS pic.twitter.com/sFkp9fiDAB
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 13, 2022
दरम्यान, पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या नुकसानावर १९८ धावा केल्या. यामध्ये धवन आणि मयंक या सलामीवीर जोडीसह यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माच्या नाबाद ३० धावांचाही समावेश होता. मुंबईसाठी बेसिल थंपीने ४७ धावा खर्च करून सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
मुबंई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
८२५ धावा- शिखर धवन*
८२४ धावा- सुरेश रैना
७८५ धावा- एबी डिविलियर्स
७६९ धावा- विराट कोहली
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शंभराव्या आयपीएल डावात मयंकची शानदार फिफ्टी; कर्णधार म्हणून पहिल्यांदाच केला खास कारनामा
हे नाही पाहिलं, तर काय पाहिलं? टी२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात घेतल्या गेल्या ६ विकेट्स, VIDEO VIRAL