शनिवारी (३० एप्रिल) आयपीएलच्या मैदानात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला ५ विकेट्सने धूळ चारली. चालू हंगामात मुंबई इंडियन्सला मिळालेला हा पहिला विजय ठरला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी हा सामना खास होता, पण त्याला संघासाठी अपेक्षित योगदान देता आले नाही. वाढदिवसाच्या खास मुहूर्तावर रोहित अवघ्या २ धावा करून बाद झाला. यानंतर त्याची पत्नी रितिका खूपच निराश झाली होती, पण तितक्यात रविचंद्रन अश्विनची पत्नी प्रीती नारायणनने तिला धीर देण्याचे काम केले.
वाढदिवसाच्या दिवशी रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठी खेळी करेल, अशी त्याच्या सर्व चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. मुंबई इंडियन्सच्या डावातील तिसरे षटक अश्विनने टाकले. या षटकातील तिसऱ्या चेंडूला चांगली उसळी मिळाली आणि तो रोहितला व्यवस्थित खेळता आला नाही. परिणामी रोहितने मारलेला हा शॉट डॅरिल मिशेलच्या हातात गेला, जो त्याने अगदी सहज झेलला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रोहितने पाच चेंडूत दोन धावा केल्या आणि विकेट गमावली. त्याची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) यावेळी निराश चेहऱ्यासह स्टँड्समधून हा सर्व प्रकार पाहत होती. रोहितला तंबूत पाठवणाऱ्या रविचंद्रन अश्विनची पत्नी प्रीती नारायणन (Prithi Narayanan) देखील यावेळी स्टेडियममधून सामन्याचा आनंद घेत होती. अश्विनने रोहितची विकेट घेतल्यानंतर रितिकाचे डोळे पाणावल्यासारखे दिसू लागले होते. तितक्यात प्रीती रितिकाच्या दिशेने धावत गेली आणि तिला धीर देण्याचे काम केले.
चाहत्यांकडून प्रीतीने मैदानात दाखवलेल्या खेळ भावणेचे कौतुक केले जात आहे. या दोघी प्रत्यक्षात जरी मैदानात खेळत नसल्या, तरी त्यांनी स्टॅन्डमध्ये केलेली ही कृती अनेकांसाठी प्रेरणादायक ठरली. यासाठी चाहत्यांकडून प्रीतीचे कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/krishnaa_ti/status/1520439390304370694?s=20&t=OidpFOFhUyym-W-wklusag
रोहितने चालू हंगामात केलेल्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ते खूपच निराशाजनक राहिले आहे. ४१ ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या राहिली आहे, जी त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केली होती. त्याव्यतिरिक्त राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने १०, तर आता दुसऱ्या सामन्यात २ धावा करून विकेट मगावली आहे. तसेच केकेआरविरुद्ध ३, आरसीबीविरुद्ध २६, तर पंजाबसोबत खेळताना २८ धावा केल्या होत्या. लखनऊ सुपर जायंट्ससोबतच्या पहिल्या सामन्यात रोहितने ६, तर दुसऱ्या सामन्यात ३९ धावा केल्या होत्या. एकंदरीत पाहता हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यात त्याने १५५ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटला हरवताच हार्दिक पांड्याची मोठी प्रतिक्रिया, “इथे ज्युनियर सिनियर काही नसतं”
केविन पीटरसनने निवडले आयपीएल २०२२ विजेतेपदाचे ३ प्रबळ दावेदार, हार्दिकच्या संघाचाही समावेश
विराटच्या षटकाराने चाहत्यांचा अटकला श्वास, हवाई फटक्यानंतर कोहलीही झाला होता दंग