इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला संघ मुंबई इंडियन्स संघ मागील १० वर्षांपासून सलग पहिला सामना पराभूत झाला आहे. यावर्षी सुद्धा संघाने पहिला सामना गमावला आहे. यावेळीही संघाची सुरुवात पराभवाने झाली असून आता मुंबई इंडियन्स संघ २ एप्रिलला राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे.
या सामन्यापूर्वी संघाला सूर्यकुमार यादवच्या रूपात आनंदाची बातमी मिळाली आहे. पूर्णपणे तंदुरुस्त असलेल्या यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो. हा मुंबईचा दूसरा सामना असून संघाने पहिला सामना दिल्ली संघाविरुद्ध खेळला आहे.
सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन या जोडीला मिळून मोठी भागीदारी करावी लागणार आहे. रोहित दिल्लीविरुद्ध काही विशेष करु शकला नाही, त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी करावी लागणार आहे. त्याने पहिल्या सामन्यात ४१ धावा केल्या. इशानने या हंगामाची सुरुवात जबरदस्त केली आहे. पहिल्या सामन्यात त्याची फलंदाजी अप्रतिम होती. त्याने ८१ धावा केल्या. मुंबईचा संघ पहिल्या पराभवानंतर संघ राजस्थानविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे.
मुंबईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे की, संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादव पूर्णपणे तंदुरुस्त आहे. जीममध्ये घाम गाळक असल्याने त्याचे राजस्थानविरुद्ध पूनरागमन निश्चित मानले जात आहे. याशिवाय अनमोलप्रीत आणि टीम डेव्हिडसुद्धा उपबल्ध असतील. त्यामुळे खालच्या क्रमांकावर सामना संपवण्याची जबाबदारी कायरन पोलार्डवर असेल.
आयपीएल लिलावपूर्वी संघाने कायरन पोलार्ड, रोहित शर्मा, जासप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवला रिटेन केले होते. लिलावात १५ कोटींहून अधिकची बोली लावत इशान किशनला विकत घेतले. जसप्रीत बुमराह, बासिल थम्पी आणि टायमल मिल्ससारखा अनुभवी गोलंदाज संघासाठी प्रभावी ठरू शकतात.
मुंबईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, कायरन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषक २०११ विजेत्या संघातील ५ असे हिरो, ज्यांचे योगदान फारसे कुणाला आठवत नाही
अविस्मरणीय सामना! गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार; २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक
का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?