इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे २ नवे संघ आले आहेत. या दोन्ही संघांच्या येण्याने आयपीएलचा रोमांच अजूनच वाढला आहे. या चालू हंगामात अनुभवी क्रिकेटपटूंसह युवा खेळाडूही दमदार प्रदर्शन करताना दिसत आहेत. यादरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने आयपीएलच्या सार्वकालिन प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.
स्पोर्ट्सकिडावर आपण निवडलेल्या सार्वकालिन आयपीएल संघाबाबत (All Time IPL Eleven) बोलताना कैफने (Mohammad Kaif) सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एमएस धोनीवर (MS Dhoni) कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार धोनीला पकडून या सार्वकालिन आयपीएल संघात ५ भारतीय क्रिकेटपटूंना जागा मिळाली. तसेच उर्वरित ६ खेळाडू हे परदेशी आहेत.
कैफने आयपीएलच्या सार्वकालिन प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्मा याची निवड केली आहे. तसेच त्याच्या जोडीला धाकड फलंदाज ख्रिस गेलला निवडले आहे. रोहित भलेही आयपीएलच्या चालू पंधराव्या हंगामात चांगली फलंदाजी करत नाहीय, परंतु त्याचे यापूर्वीचे प्रदर्शन प्रशंसनीय राहिले आहे. तर गेलनेही सलामीला फलंदाजी करताना खोऱ्याने धावा काढल्या आहेत.
गेल आणि रोहितची जोडी बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी कैफने विराट कोहलीवर दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या या स्टार फलंदाजाची तिसऱ्या क्रमांकावरील कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. विराटच्या जोडीला कैफने मिस्टर आयपीएल सुरेश रैनाला घेतले आहे.
पुढे मधल्या फळीत बेंगलोरचा माजी धाकड फलंदाज एबी डिविलियर्सला सहभागी केले आहे. डिविलियर्सने आयपीएलमध्ये बेंगलोर संघासाठी धडाकेबाज खेळ दाखवला आहे. यंदा निवृत्तीमुळे तो आयपीएलमद्ये सहभागी झाला नाही. डिविलियर्सनंतर चेन्नईचा मॅच फिनिशर धोनीला ठेवले आहे. तसेच त्याच्या नेतृत्त्वपदाचीही जबाबदारी आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलला कैफने अष्टपैलू म्हणून संघात सहभागी केले आहे. तसेच राशिद खान आणि सुनिल नारायण यांना फिरकीपटू म्हणून निवडले आहे. वेगवान गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा यांना सामील केले आहे. या दोन्हीही गोलंदाजांनी आयपीएलमध्ये मुंबई संघाला मोठे विजय मिळवून देण्यात मोलाचे सहकार्य केले आहे.
मोहम्मद कैफने निवडलेली आयपीएलची सार्वकालिन प्लेइंग इलेव्हन-
ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, एबी डिविलियर्स, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, राशिद खान, सुनिल नारायण, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
“जर तो धोनीचा चाहता असेल, तर त्याने त्याच्याकडून शिकले पाहिजे”, पंतला भारतीय दिग्गजाचा सल्ला
‘ना खुद्द विराट खुश आहे, ना लोक’, खराब फॉर्ममधून जात असलेल्या कोहलीबद्दल युवराजचे वक्तव्य