जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग मानली जाणारी इंडियन प्रीमियर लीग, म्हणजेच आयपीएल येत्या २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आगामी हंगामात आठ ऐवजी १० संघ आयपीएलच्या मैदानात खेळताना दिसणार आहेत. आयपीएलचे प्रसारक कंपनी स्टार स्पोर्टने आगामी आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी एक जबरदस्त प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये स्वतः एमएस धोनी बोलताना दिसत आहे.
आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने खेळाडूंचा मेगा लिलाव आयोजित केला होता. मेगा लिलावात अनेक खेळाडूंना नवीन संघाची साथ मिळाली आहे. तसेच चाहत्यांचे काही आवडते खेळाडूही वेगवेगळ्या फ्रँचायझीमध्ये दाखल झाले आहेत. एकंदरीत पाहता संघांमध्ये खूप फेरबदल झाले आहेत आणि त्याचा परिणाम मैदानात दिसणार आहे. एमएस धोनीच्या या प्रोमोमध्येही तो हीच गोष्ट समजावण्याचा प्रयत्न करत आहे. धोनीच्या मते आगामी आयपीएल हंगामात कोणताही संघ बाजी मारू शकतो.
स्टार स्पोर्टने सोशल मीडियावरही हा प्रोमो शेअर केला आहे. त्याची सुरुवात एक तणावपूर्ण परिस्थितीत होते. बाँम्ब स्क्वॉडचे दोन कर्मचारी एका बाँम्बला बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. या दोन कर्मचाऱ्यांमध्ये निळी आणि पिवळी या दोन्हीपैकी कोणती वायर कापायची याविषयी गोंधळ निर्माण झाला आहे. तितक्यात एमएस धोनी (MS Dhoni) त्याठिकामी एका स्क्रीनवर दिसतो आणि त्यांना काही सल्ले देण्याच प्रयत्न करतो. धोनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो की फक्त निळी आणि पिवळीच वायर धमाका करेल असे समजू नका. परंतु, ते कर्मचाही त्याच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांची मनाचाच निर्णय घेतात.
परिणामी मोठा बाँम्ब धमाका होते. धोनी पुन्हा स्क्रीनवर दिसतो आणि सांगतो की, “पाहिलं इथे काय फक्त निळी आणि पिवळी धमाका करत नाही. याठिकाणी कोणीही धमाका करू शकते.”
Maana ???? aur ???? ka raha hai domination, par naye saal mein kisi naye rang ka bhi dikh sakta hai tashan – #TATAIPL mein #YehAbNormalHai!
Catch all the LIVE action from the 2022 season.
LIVE, Mar 26 onwards | Star Sports & Disney+Hotstar pic.twitter.com/OgfgVQhJDU
— Star Sports (@StarSportsIndia) March 14, 2022
दरम्यान, एमएस धोनीच्या नेतृत्वीतील चेन्नई सुपर किंग्ज (Channai Super Kings) संघाची जर्सी पिवळ्या रंगाची आहे, ज्यांनी आतापर्यंत चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. तसेच मुबंई इंडियन्स (Mumbai Indians) असा संघ आहे, ज्यांनी आतापर्यंत सर्वाधिक ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि त्यांच्या जर्सीचा रंग निळा आहे. या प्रोमोमधून धोनीला असा संदेश द्यायचा आहे की, आगामी हंगामात मुंबई आणि चेन्नई सोडून इतरही संघ शर्यतीत असतील.
महत्वाच्या बातम्या –
कसोटी क्रिकेट झालं तब्बल १४५ वर्षांचं! कसा झाला होता सर्वात पहिला सामना, घ्या जाणून
पीवायसी रिबाउंड रॅकेट लीग २०२२ स्पर्धेत तलवार्स व मस्किटर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत






