भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि त्याची आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जच्या सर्व खेळाडूंनी नुकतीच एक सांघिक उपक्रम राबवला. यामध्ये धोनीसह संघातील जवळपास सर्व खेळाडू सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे संघातील खेळाडूंमधील नाते अधिक घट्ट होण्यासाठी मदत होईल.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता. पहिल्या सामन्यात त्यांच्यापूढे कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान होते, जे त्यांना पेलता आले नाही. पहिल्या सामन्यात सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) एकटाच असा खेळाडू होता, जो अर्धशतक करू शकला. इतर सर्व खेळाडू अर्धशतकाच्या आधीच तंबूत परतले होते. आता दुसऱ्या सामन्यापूर्वी सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाने खेळाडूंमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आयोजित केला होता.
सीएसकेच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर या उपक्रमाचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, मोईन अली, ऋतुराज गायकवाड आणि संघातील इतर सर्व खेळाडू या उपक्रमात सहभागी झाले आहेत. खेळाडूंनी संघासाठी विंटांची एक छोटीशी रचना तयार केली आहे.