येत्या काही दिवसांत इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची (IPL 2022) सुरुवात होणार आहे. २६ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी चेन्नईचा संघ सूरतच्या लालभाई स्टेडियमवर सराव करतो आहे. या सरावात चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्याबरोबरच इतर खेळाडूही सहभागी झाले आहेत. यातीलच एक खेळाडू, १९ वर्षीय राजवर्धन हंगारगेकर (Rajvardhan Hangargekar) हादेखील धोनीसोबत सराव (Rajvardhan Hangargekar Nets Practice With Dhoni) करत आहे.
विशेष म्हणजे, हंगारगेकर धोनीला त्याचा आदर्श मानतो. त्यामुळे आता चक्क धोनीकडून त्याला धडे मिळत असल्याने एकप्रकारे त्याची स्वप्नपूर्ती झाली आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक संघाचा भाग राहिलेल्या हंगारगेकरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर धोनीसोबत सराव करतानाचे बरेच फोटो पोस्ट केले आहे. त्याने हे फोटो पोस्ट करत कॅफ्शनमध्ये लिहिले आहे की, ‘दिग्गजाकडून शिकतो आहे.’
Lots of talk between MS Dhoni and Rajvardhan Hangargekar – CSK coaches are working with the batting stance as well of Rajvardhan during day 1 of practice session. pic.twitter.com/WnKFfRh7Mh
— Johns. (@CricCrazyJohns) March 8, 2022
Hangargekar officially joins dhoni school pic.twitter.com/0I96YPo8vc
— ‘ (@Ashwin_tweetz) March 7, 2022
Yes hangargekar likely to play most of the matches or all the matches who knows,if dhoni believe in him, finished he'll play every match…. https://t.co/oKnlo8aUiv
— Dr.Hemanth.t.m (@msdhonihemanth) March 7, 2022
हंगारगेकर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांप्रमाणे करू इच्छितोय फलंदाजी
इतर खेळाडूंप्रमाणे हंगारगेकरही सूरतमध्ये लालईभाई स्टेडियमवर लावण्यात आलेल्या चेन्नई संघाच्या कँपमध्ये सहभागी झाला आहे. तो येथे फलंदाजीबरोबरच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचाही सराव करताना दिसला आहे. तसेच त्याने सराव सत्रादरम्यान धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉटही मारले आहेत. कारण हा युवा अष्टपैलू आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजच्या विस्फोटक फलंदाजांप्रमाणे फटकेबाजी करू इच्छित आहे. त्यामुळे तो सराव सत्रातही मोठमोठे फटके मारण्यासाठी प्रयत्नशील आहे.
Rajvardhan Hangargekar's 🚁💥#WhistlePodu | #IPL2022 pic.twitter.com/lABo7GGoaw
— CSK Fans Army™ (@CSKFansArmy) March 8, 2022
Hangargekar from Day 1 practice 🦁🔥#WhistlePodu | #IPL2022 pic.twitter.com/K8kx6GlsCI
— CSK Fans Army™ (@CSKFansArmy) March 7, 2022
Rajvardhan Hangargekar 🥵🔥#WhistlePodu | #IPL2022 pic.twitter.com/jxpQ4UTNA5
— CSK Fans Army™ (@CSKFansArmy) March 7, 2022
चेन्नईने १ कोटी ५० लाख रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले होते. मेगा लिलावात चेन्नईने त्याला विकत घेतल्यानंतर तो म्हणाला होता की, “माझी मानसिकता वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंप्रमाणे खेळण्याची आहे. मला वेगवान गोलंदाजी करायला तर आवडतेच. पण मला लांब लांब षटकार मारायलाही खूप आवडते.”
चेन्नई सुपर किंग्ज संघ – रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, दीपक चाहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, ड्वेन ब्राव्हो, डेवॉन कॉनवे, शुभ्रांशू सेनापती, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महिश तिक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, प्रशांत सोळंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
जो रूटचा अंदाज चुकला, स्टंपला कव्हर करत विकेट वाचवण्याच्या नादात दांड्याच उडून पडल्या- VIDEO
टी२० विश्वचषक खेळला जाणार बदललेल्या नियमांनुसार, १ ऑक्टोबरपासून लागू होणार ‘हे’ कायदे
वाॅर्नचे खांदे कसे बनले मजबूत?, अश्विनने सांगितली द्रविडकडून ऐकलेली बालपणीची कहाणी