इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये खेळला जाणार आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सर्व खेळाडूंना कडक सुचना दिल्या आहेत. बीसीसीआयने कोरोनामुळे कडक निर्बंध लागू केले असून नियम तोडणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. हे नियम मोडले जाऊ नयेत, म्हणून मुंबई इंडियन्स संघाने १३ हजार चौरस मीटरचा बायोबबल तयार केले आहे.
बीसीसीआयने (BCCI) दिलेले नियम तोडले जाऊ नयेत म्हणून मुंबई फ्रॅंचायझीने आपल्या संघातील खेळाडूंसाठी जियो वर्ल्ड गार्डनमध्ये बायो सिक्योर एमआय अरेना तयार केला आहे. हा अरेना १३ हजार चौरस मिटरपर्यंत पसरलेला आहे. याच्या माध्यमातून खेळाडूंची, त्यांच्या कूटुंबाची, प्रशिक्षक स्टाफ आणि सहकारी स्टाफ या सर्वांच्या सुरक्षितेची काळजी घेतली जाणार आहे.
फ्रॅंचायझीच्या म्हणण्यानुसार, मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) या सुविधेमुळे संघ एकत्र येण्यास मदत होईल आणि खेळाडूंना आराम मिळेल. तसेच त्यांना संतुलित जिवन जगण्यासाठी याचा फायदा होईल. एमआय अरेनामध्ये संघ आणि व्यक्तिगत क्षेत्र दोन्हींचा समावेश असणार आहे. हे मुख्य बायोबबलचा भाग आहे. या शिवाय फुटसल ग्राउंड, पिकल बॉल कोर्ट, बॉक्स क्रिकेट, फुट वॉलीबॉल, गोल्फ ड्राइविंग रेंज, एमआई बैटलग्राउंड, मिनी गोल्फ, एमआई कॅफे आणि एका किड्स झोनची सुद्धा सुविधा असणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या एका प्रवक्त्यांने सांगितले की, ‘एमआय अरेना संघाला हंगामादरम्यान एकमेकांना जाणून घेण्यासाठी आणि ओळखण्यासाठी बनवण्यात आले आहे. मागील दोन वर्षांमध्ये लोकांनी अनेक संकटांचा सामना केला आहे, परंतु आपण एक कूटुंब आहोत आणि मुंबईची ही जबाबदारी आहे की सर्व खेळाडूंना सुरक्षित आणि आनंदी ठेवणे.’
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईचा पहिला सामना २७ मार्चला दिल्ली कॅपिटल्स संघासोबत ब्रेबोर्न स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. यावर्षी इशान किशनवर सर्वात जास्त बोली लागल्याने त्याच्याकडून खुप अपेक्षा असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
षटकारांच्या ‘या’ शानदार विक्रमात सीएसकेचा धोनीच ‘सिक्सर किंग’, विस्फोटक गेल टॉप-५मध्येही नाही
‘मी अजून वाट पाहू शकत नाही’, जुन्या सहकाऱ्यासोबत पुन्हा आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक आहे कमिन्स