इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम शनिवारपासून (२६ मार्च) सुरु झाला आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये पार पडला. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना सीएसकेने केकेआरपुढे १३१ धावांचे लक्ष्य ठेवले. सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा झाला नाही. आयपीएलचा उद्घाटन सोहळा न होण्याचे हे सलग चौथे वर्ष आहे. उद्घाटन सोहळ्याऐवजी बीसीसीआयने टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंसह अनेक खेळाडूंचा सामन्यापूर्वी सन्मान केला. यामध्ये सुवर्णपदक विजेत्या निरज चोप्राला १ कोटी रुपये देऊन गौरवण्यात आले.
कोलकाता आणि चेन्नई (KKR vs CSK) यांच्यातील सामन्यापुर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह हे उपस्थित होते. यामध्ये सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला एक कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नीरज, बजरंग पुनिया, रवी दहिया, लव्हलिना बोरगोहेन यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनदीप सिंग यालाही गौरव करण्यात आले. गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली होती.
Champions Honoured! 👏 👏
BCCI felicitates India’s Olympic medalists at #Tokyo2020@Neeraj_chopra1, @LovlinaBorgohai and @manpreetpawar07
#TATAIPL pic.twitter.com/AbniKtxxEr— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2022
फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले नाही. पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आणि या शहीदांच्या सन्मानार्थ आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. यानंतर २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे उद्घाटन सोहळा होऊ शकला नाही. आता उद्घाटन सोहळा २०२२ मध्येही झाला नाही. २०१८ मध्ये आयपीएलमधील शेवटचा उद्घाटन सोहळा पार पडला होता. पण त्यानंतर २०१९ पासून एकही उद्घाटन सोहळा झालेला नाही.
आयपीएल २०२२ मध्ये एकूण १० संघ खेळताना दिसणार आहेत. आयपीएल २०२२ लीगचे सर्व सामने मुंबई आणि पुण्यामध्ये पार पडणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात जडेजाची अक्षम्य चूक! संघाला टाकले अडचणीत
अखेर मेहनत फळाला आली! तब्बल इतक्या सामन्यांच्या प्रतीक्षेनंतर जड्डू बनला कॅप्टन
पहिला सामना | केकेआरकडून रहाणेचे पदार्पण, तर सीएसकेकडून धाकड सलामीवीराला संधी; पाहा प्लेइंग XI