---Advertisement---

बाकीच्यांचं जाऊच द्या, पॅट कमिन्सच्या अफलातून खेळीवर पार्टनरही फिदा; म्हणाली, ‘वेलडन सुपरस्टार’

On: गुरूवार, एप्रिल 7, 2022 9:14 PM
Pat-Cummins
---Advertisement---

पॅट कमिन्सच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२२ हंगामातील त्यांचा तिसरा विजय मिळवला. बुधवारी (६ एप्रिल) खेळल्या गेगेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सकडून मात मिळाली. पॅट कमिन्सच्या जबरदस्त अर्धशतकानंतर केकेआरने ४ षटके शिल्लक ठेवत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या खेळीनंतर कमिन्सची पार्टनर बेकी बोस्टननेही त्याचे कौतुक केले आहे. बोस्टनने स्वतःच्या इंस्टाग्रामवर कमिन्सचा फोटो शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्ससाठी (Pat Cummins) आयपीएल २०२२ मधील हा पहिलाच सामना होता. पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळत असल्यामुळे तो केकेआरसाठी पहिल्या तीन सामन्यांमध्ये उपस्थित राहू शकला नाही. हंगामातील हा त्याचा पहिला सामना असून यामध्ये त्याने १५ चेंडूत तब्बल ५६ धावा केल्या आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर उपस्थित राहिला. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याच्या या अप्रतिम खेळीच्या जोरावर केकेआरने मुंबईला ५ विकेट्स राखून पराभूत केले. कमिन्सची पत्नी बेकी बोस्टन (Becky Bosten) हिने स्वतःच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून त्याचे कौतुक केले आहे. कॅप्शनमध्ये बोस्टनने, “वेलडन सुपरस्टार”, असे लिहिले आहे

Pat-Cummins-Partner-Post
Photo Courtesy: Instagram/becky_boston

आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात केकेआरने कमिन्सवर विश्वात दाखवून त्याच्यासाठी ७.५ कोटी खर्च केले आणि पुन्हा एकदा संघात घेतले. आता त्याने हंगामातील पहिल्याच सामन्यात स्वतःला सिद्ध केले आहे. दरम्यान, सामन्यात सुरुवातीला नाणेफेक जिंकून केकेआरने मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ४ विकेट्सच्या नुकसानावर १६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने हे लक्ष्य अवघ्या १६ षटकांमध्ये आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.

मुंबईसाठी सूर्यकुमार यादव (३६ चेंडूत ५२ धावा) आणि तिलक वर्मा (२७ चेंडूत ३८ धावा) यांनी मधल्या फळीत चांगले प्रदर्शन केले. तसेच, सातव्या क्रमांकावर आलेल्या कायरन पोलार्डने अवघ्या ५ चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने नाबाद २२ धावा ठोकल्या. केकेआरसाठी कमिन्सव्यतिरिक्त सलामीवीर वेंकटेश अय्यरने सर्वोत्तम फलंदाजी केली. वेंकटेशने ४१ चेंडूत नाबाद ५० धावा ठोकल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

पदार्पणाच्या सामन्यातच ‘बेबी एबी’ने ठोकला गगनचुंबी ‘नो लूक सिक्स’, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

‘आम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती, तो ज्यापद्धतीने आला…’, वाचा पराभवानंतर कमिन्सबद्दल काय म्हणाला रोहित

LSG vs DC | नाणेफेक जिंकत राहुलचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, दिल्लीच्या ताफ्यात २ धुरंधरांची एन्ट्री

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---