आयपीएल २०२२ च्या ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज आमने सामने होते. दिल्ली कॅपिटल्सने १७ धावांनी हा सामना नाववर केला आणि प्लऑफच्या चार संघातमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले. दिल्लीचा सालामीवीर डेविड वॉर्नर या सामन्यात एकही धाव करू शकला नाही, पण सरफराज खानने मात्र, संघाला वेगवान सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. सरफराजच्या एका उत्कृष्ट शॉटचे सध्या सर्वत्र चर्चा केली जात आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर सरफराज खान (Sarfaraz Khan) डेविड वॉर्नरने विकेट गमावल्यानंतर दबावात आला नाही. सरफराजने दिल्लीच्या डावाची सुरुवात करत असताना १६ चेंडूत ३२ धावांची ताबडतोड खेळी केली. या धावा करण्यासाठी त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. यादरम्यान सरफराजने एक उत्कृष्ट स्कूप शॉटही मारला, जो पाहून चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सरफराज मोठी खेळी करू शकला नाही, पण या ३२ धावांच्या छोट्याशा खेळीमध्ये त्याने अनेक उत्कृष्ट शॉट्स खेळले. त्याच्या स्कूप शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ICYMI – A boundary ft. Sarfaraz's scoop 👀👀
📽️📽️https://t.co/fX2UOgUCcW #TATAIPL #PBKSvDC
— IndianPremierLeague (@IPL) May 16, 2022
सरफराज दिल्लीच्या डावातील पाचव्या षटकात बाद झाला. अर्शदीप सिंगच्या एका चेंडूवर तो षटकार मारण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू जास्त लांब न गेल्यामुळे तो झेलबाद झाला. राहुल चाहरने त्याचा झेल पकडला. ज्या चेंडूवर सरफराज बाद झाला, त्याच्या आधीच्या चेंडूवर गोलंदाजासोबत त्याचा काहीतरी वाद झाला होता. याच रागात त्याने हा शॉट खेळला आणि विकेट गमावली.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पंजाब किंग्जने सर्वप्रथम नाणेफेक जिंकली आणि दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जला हे लक्ष्य गाठता आले नाही. पंजाबने मर्यादित २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १४२ धावा केल्या आणि १७ धावांनी पराभव स्वीकारला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मयंकची विकेट अक्षर पटेलसाठी ठरली विक्रमी, खास शतक पूर्ण केलेच; अष्टपैलूंचा रेकॉर्डही नावावर झाला
अरेरे! आधी ९९, आता १९९; अँजेलो मॅथ्यूजच्या नावावर झाला कसोटी क्रिकेटमधील ‘नकोसा’ विश्वविक्रम
‘त्या’ दोन घटना घडल्या नसत्यास तर आयपीएल इतकी यशस्वी झालीच नसती…