इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ अतिशय खराब प्रदर्शन करताना दिसत आहेत. आयपीएलमधील हे सर्वात यशस्वी संघ विजयासाठी झगडताना दिसत आहेत. मुंबईला त्यांनी खेळलेल्या ७ पैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. तर चेन्नई संघाने ७ पैकी २ सामने जिंकले आहेत. परिणामी हे दोन्हीही संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहेत. अशात त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा मावळताना दिसत आहेत.
मुंबईसाठी कशी असतील प्लेऑफची समीकरणे
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली ५ वेळा आयपीएल ट्रॉफी पटकावणारा मुंबई संघ (Mumbai Indians) चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास (Play-Off Scenario) बाहेर पडला आहे. आता त्यांचे केवळ ७ सामने बाकी आहेत. जरी मुंबईने त्यांचे उरलेले सातही सामने जिंकले, तरीही त्यांना याचा जास्त फायदा होणार नाही. कारण त्यांचा नेट रन रेट (-०.८९२) सध्या फारच कमी आहे.
जर मुंबईने त्यांचे सर्व साखळी फेरी शिल्लक सामने मोठ्या अंतराने जिंकले, तर त्यांना इतर संघांच्या प्रदर्शनावर अवलंबून राहावे लागेल. पुढील सातही सामने जिंकल्यानंतर त्यांच्या खात्यात १४ गुण जमा होतील. मात्र या हंगामात एकूण १० संघ खेळत असल्याने त्यांच्यासाठी हे गुण अपुरे पडतील. मात्र उर्वरित सामने जिंकत मुंबईचा संघ इतर संघांची प्लेऑफची गणित बिघडवू शकतो.
चेन्नईसाठी कशी असतील प्लेऑफची समीकरणे
चार वेळचा आयपीएल विजेता चेन्नई संघ (Chennai Super Kings) सध्या ७ पैकी २ सामने जिंकत गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. त्यांचाही नेट रन रेट मुंबईप्रमाणेच निगेटिव्ह (-०.५३४) आहे. अशात चेन्नईला प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित ७ पैकी कमीत कमी ६ सामने जिंकावे लागतील, तेही मोठ्या अंतराने.
जर रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नेतृत्त्वाखाली चेन्नईने राहिलेल्या ७ पैकी सातही सामने जिंकले, तर त्यांच्या खात्यात १८ गुण जमा होती. ज्यानंतर त्यांच्या प्लेऑफचा मार्ग सोईस्कर होईल. असे असले तरीही, चेन्नईलाही इतर संघांच्या प्रदर्शनावर अवलंबून राहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘खूश आहे की कंपनीच्या नावात माही’, धोनीच्या खेळावर आनंद महिंद्राही फिदा
ब्रेकिंग! प्रविण आमरे यांच्यावर बंदी, तर पंत, ठाकूरवरही मोठी कारवाई; नो बॉलचा वाद आला अंगाशी
IPL 2022| शतक केलं बटलरने आणि निशाण्यावर आला विराट, मीम्स सोशल मीडियावर व्हायरल