कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या खेळाडूंनी नुकतेच प्रविण तांबे यांच्या बायोपिकचे स्पेशल स्क्रिनिंग पाहिले. ते पाहताना प्रविण तांबे खुपच भावूक झाल्यात दिसला. चित्रपट संपल्यानंतर त्यावर बोलताना तो रडू लागला. केकेआरने आपल्या ट्वीटर आकाऊंटवरुन त्याचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
तांबे केकेआरसाठी फिरकी गोलंदाजीचा मार्गदर्शक आहे. त्याच्या जीवनावर आधारित आलेला हा चित्रपट संपल्यानंतर तो जेव्हा बोलण्यासाठी उठला, तेव्हा तो एवढा भावूक झाला की काही वेळ त्याला काहीच बोलता आले नाही.
तांबेने २०१३ मध्ये वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये (IPL 2022) पदार्पण केले होते. ५० वर्षीय तांबे यांनी संघर्षादरम्यान एकाचवेळी काम आणि क्रिकेटचा समतोल साधला. परंतु, त्यांच्यासाठी कोणत्याही देशांतर्गत संघात स्थान मिळवणे कठीण होते. पण त्याने हार मानली नाही. त्याच्या संघर्षाचे आणि मेहनतीचे त्याला फळ देखील मिळाले आहे.
तांबे २०१३ च्या आयपीएलमध्ये राजस्थान संघासाठी खेळला आणि त्यानंतर गुजरात लायंस आणि कोलकाता नाइट रायडर्स(KKR) संघाचेही त्याने प्रतिनिधित्व केले. यानंतर तो केकेआरच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहभागी झाला. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ३३ सामन्यांत २८ विकेट्स घेतल्या आहेत.
"???????????????????? ???????????????? ???????? ???????? ???????????????? ????????????????????????, ???????????????? ???????? ???????????????? ????????????????" ????
???? Scenes from last night as the boys watched the inspiring #KaunPravinTambe at a special screening by @DisneyPlusHS! @legytambe #KKRHaiTaiyaar #IPL2022 pic.twitter.com/LKjABXk1Qj
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
जेव्हा केकेआरचे खेळाडूंनी चित्रपटाची स्क्रिनिंग पाहिली तेव्हा प्रविण तांबेने यावर आपले मत मांडले. यादरम्यान तो म्हणाला की, ‘आपल्या स्वप्नांना कधीच सोडू नका, ती खरी होतात.’ तसेच केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही खूप काळापासून स्क्रीनिंगची वाट पाहत होताे. हा एक शानदार चित्रपट आहे. गाणी सुद्धा चांगली आहेत आणि शेवटी या चित्रपटाने भावूक केले.’
यापूर्वी प्रविण तांबेच्या बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तांबेचा जीवनप्रवास आणि संघर्ष दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट १ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. केकेआर संघाने आयपीएलच्या १५ व्या हंगामाची यशस्वी सुरुवात करत सीएसकेविरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे.
तसेच आरसीबीविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर १ एप्रिलला पंजाबविरुद्ध झालेला आपला तिसरा सामना संघाने ६ विकेट्सने जिंकला आहे. आता संघ ६ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध आपला चौथा सामना खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?
ईशान-सूर्याच्या फिटनेसबाबत मुंबई इंडियन्सकडून आले अपडेट; राजस्थानविरुद्ध…
चार हजारी मनसबदार! ‘कूल’ रहाणेच्या आयपीएलमध्ये ४००० धावा पूर्ण






