आयपीएल २०२२ हंगामची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. आगामी हंगामासाठी सर्व संघांनी मेगा लिलावात एक भक्कम संघ तयार करण्याचा प्रयत्न केला. पंजाब किंग्जनेही एक चांगला संघ तयार केला आहे, ज्याचे नेतृत्व सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल करेल. बुधवारी (१६ मार्च) सायंकाळी झालेल्या पंजाब किंग्ज संघाच्या सराव सत्रात संघातील खेळाडूंनी कर्णधार मयंकचे स्वागत टाळ्या वाजवून केले.
आगामी हंगामात मयंक अगरवाल (Mayank Agarwal) पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा मयंकला एखाद्या आयपीएल संघाचा नियमित कर्णधार बनवले गेले असेल. २०१८ साली मयंक पंजाब किंग्जच्या ताफ्यात दाखल झाला होता आणि २०२२ हंगामात त्याला नेतृत्वाची संधी मिळाली.
मागच्या हंगामात केएल राहुल पंजाब किंग्जचा कर्णधार होता, परंतु आगामी हंगामापूर्वी राहुलने संघाची साथ सोडली आणि लखनऊ सुपर जायंटन्समध्ये सहभागी झाला. त्यामुळेच मयंकला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मयंकने यापूर्वी फक्त एका सामन्यात पंजाबचे नेतृत्व केले आहे, ज्या सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला होता.
https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1504094893433831428?s=20&t=x0AglB8uRPZykRUeDgOaWg
आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्समुळे पंजाब किंग्जचे चांगलेच नुकसान झाले. लखनऊ संघाने पंजाबचा माजी कर्णधार केएल राहुलला १५ कोटी रुपयांमध्ये संघात रिटेन केले होते. राहुलसोबत पंजाबचा युवा खेळाडू रवी बिश्नोईलाही लखनऊने संघात सामील केले. तसेच पंजाब किंग्जने माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर देखील लखनऊ सुपर जायंट्नच्या ताफ्यात सहभागी आहेत. दुसरीकडे मयंक अगरवालला रिटने करण्यासाठी पंजाब किंग्जला १२ कोटी रुपये खर्च करावे लागले होते.
https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1504110973980135424?s=20&t=9dAbK2Zy56G7pis6_Wf17w
पंजाब किंग्जने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकही विजेतेपद मिळवले नाही. पंजाब किंग्ज फक्त एकदा २०१४ हंगामात आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने त्यांना पराभूत केले होते. मयंकच्या खांद्यावर पंजाबला त्यांचे पहिले विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.
दरम्यान, मागच्या महिन्यात १२ आणि १३ तारखेला झालेल्या आयपीएल मेगा लिलावात पंजाब किंग्जने चांगल्या खेळाडूंना खरेदी करून संघ भक्कम केला आहे. आता पंजाबकडे शिखर धवन, कगिसो रबाडा, लियाम लिविंगस्टोन, जॉनी बेयरस्टो आणि शाहरुख खान यांच्यासारखे टी-२० प्रकारातील दिग्गज सहभागी आहेत.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022 | राजवर्धन हंगरगेकरला ‘कॅप्टनकूल’ धोनीचा सल्ला, ‘या’ गोष्टीत करायला सांगितली सुधारणा
‘विराटने कर्णधारपद सोडणे विरोधी संघासाठी धोक्याची घंटी’, असे का म्हणाला ग्लेन मॅक्सवेल? घ्या जाणून
IPL 2022 | नवीन इनिंग सुरू करण्यासाठी डेल स्टेन भारतात दाखल, यंदा दिसणार ‘या’ भूमिकेत