इंडियन प्रीमियर लीगसाठी सर्व संघ सराव करत आहेत, काही खेळाडू फ्रॅंचायझीला जोडले जात आहेत. पंजाब किंग्स संघाने आयपीएलच्या (IPL 2022) आगामी हंगामासाठी तयारी पूर्ण केली आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे सर्व सामने पुणे आणि मुंबईमध्ये खेळले जाणार आहेत. सोशल मिडीयावर या संघाची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान पंजाब किंग्स संघाने भारतीय फलंदाज शाहरुख खानचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
पंजाब किंग्सच्या नजरा यावेळी आयपीएलच्या ट्राॅफीवर असणार आहेत. पंजाब संघ आयपीएल इतिहासातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक आहे. या संघाने आत्तापर्यंत एकदाही आयपीएल ट्राॅफी जिकलेली नाही, परंतु संघ एका हंगामात अंतिम फेरीत पोहचण्यास यशस्वी झाला होता.
पंजाब किंग्सच्या ट्वीटर आकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या बादशाह गाण्यावरुन भारतीय खेळाडू शाहरुख खानचा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. यामध्ये तो फलंदाजीची तयारी करत मैदानात आलेला दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की ‘बादशाह ओ बादशाह’.
शाहरुख खानला पंजाब किंग्स संघाने ९ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. आयपीएल २०२२ च्या लिलावात या संघाने सर्वाधिक खेळाडूंना विकत घेतले आहे, कारण यापुर्वी संघाने फक्त दोनच खेळाडूंना संघात रिटेन केले होते. लिलावात पंजाब संघ शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि कगिसो रबाडा या खेळाडूंना खरेदी करण्यात यशस्वी झाला आहे. यावेळी मयंक अग्रवाल संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. केएल राहुलला लखनऊ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
केकेआर संघाचा मालक शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि पंजाबचा फलंदाज शाहरुख खान यांचे नाव एकच असल्याने भारतीय फलंदाज चर्चेत असतो. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्राॅफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) तमिळनाडूकडून खेळताना अंतिम सामन्यांत षटकार लगावत संघाला चॅम्पियन बनवले होते. तो पंजाब संघासाठी खेळताना शेवटच्या षटकांमध्ये उत्तम कामगिरी करु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमधील ‘या’ पराक्रमांमध्ये गेलच ‘बॉस’, गेल्या ९ वर्षांपासून अबाधित आहेत विक्रम
आता बंधन नव्हे तर मोकळीक वाटणार! मुंबई इंडियन्सने तयार केलाय १३ हजार चौरस मीटरचा बायो-बबल





