---Advertisement---

‘चूका कर आणि लोकांसमोर अपयशी हो’, अश्विनला भारताच्या माजी प्रशिक्षकाने दिलेला अनोखा गुरूमंत्र

R-Ashwin
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन मधल्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब होता. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक संघात त्याला आश्चर्यकारकपणे संधी मिळाली आणि त्याने चांगले पुनरागमन केले. सध्या आयपीएल २०२२ मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. अश्विनने आता भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षकाकडून त्याला मिळालेल्या एका सल्ल्याची आठवण करून दिली आहे.

आयपीएल २०२२ मध्ये रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) चांगले प्रदर्शन करत आहे. यावर्षी त्याने गोलंदाजीसोबतच फलंदाजीत देखील महत्वाचे योगदान दिले आहे. राजस्थान रॉयल्सच्या युट्यूब चॅनलवर बोलताना अश्विनने त्याच्या खेळाच्या शैलीविषयी मोकळेपणाने चर्चा केली.

तो म्हणाला की, “खूप वर्षांपूर्वी डंकन फ्लेचर भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. मी नेहमी त्यांना विचारायचो की, मी अधिक उत्तम कसा बनू शकतो ? मी सुधारणा करण्यासाठी काय करू? यावर त्यांचे सरळ उत्तर असायचे की, एकच मार्ग आहे, ज्यामुळे तू अजून चांगला बनू शकतो. तो मार्ग आहे चूका करणे आणि लोकांसमोर अपयशी होणे, मी हीच गोष्ट माझ्या संपूर्ण आयुष्यात करत आलो आहे.”

“मला याविषयी नेहमी ऐकून घ्यावे लागले आहे की, मी कशा पद्धतीने माध्या सीमा ओलांडून विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे. कधी-कधी लोकांना वाटते की मी हे सर्व काय करत आहे? मी अती महत्वाकांशी आहे का ? पण एका खेळाडू आणि माणसाच्या रूपात मी असाच आहे. जर तुम्ही माझ्यातून ही गोष्ट काढून घेतली, तर मी पूर्णपणे मोकळा होईल. मला ज्या पद्धतीचे स्वातंत्र्य आणि वातावरण पाहिजे, जर ते मिळाले, तर मी खूप काही मिळवू शकतो,” असेही अश्विन पुढे म्हणाला.

आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्ध घोषीत करण्यात आलेल्या टीम इंडियाचं स्कॉड अनालिसिस | Team India Squad

दरम्यान, चालू हंगामातील अश्विनचे प्रदर्शन पाहिले, तर त्याने खेळलेल्या १५ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीतही महत्वाचे योगदन देत त्याने १८५ धावा केल्या आहेत. त्याचा संघ राजस्थान रॉयल्स पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सपुढे पराभूत झाला. आता त्यांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दुसरी संधी शुक्रवारी आहे. दुसऱ्या क्लालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आमने सामने असतील.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

गेम! एका भारतीय क्रिकेटरने ठरवून पाकिस्तानी खेळाडूला जिंकू दिली नव्हती ऑडी कार

चहलला खुणावतायेत मोठे विक्रम! बेंगलोरविरुद्ध कमाल करत मलिंगा, बुमराहलाही ठरू शकतो वरचढ

कट्टर विरोधक पाकिस्तानचा धुव्वा उडवत रवी शास्त्री बनले होते ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’, जिंकली होती ‘ऑडी १००’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---