मागच्या महिन्यात ४ मार्च रोजी जागतिक क्रिकेटमधील महान लेग स्पिनर शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला. थायलंडमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेलेल्या वॉर्नला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. वॉर्नने आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सला पहिल्या आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावून दिले होते. आता राजस्थानने त्यांच्या दिग्गजाच्या आठवणीत एक खास दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे.
आयपीएल २००८च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जला तीन विकेट्सने पराभूत केले होते. हा सामना मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला गेला होता. आता याच स्टेडियमवर ३० एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्स संघाशी होणार आहे. आता मुंबईविरुद्धचा हा सामना कायम आठवणीत राहणार आहे. कारण, राजस्थान फ्रँचायझीने शेन वॉर्न (Shane Warne) याच्या आठवणीत हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ज्या मैदानात वॉर्नने राजस्थानला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली, आता त्याच मैदानात फ्रँचायझी वॉर्नच्या सन्मानात त्याचा अविस्मरणीय जीवनप्रवास साजरा करणार आहे. फ्रँचायझीने सांगितल्याप्रमाणे, वॉर्नच्या जीवनातील योगदानाचे आनंद साजरी करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस आणि जागा असू शकत नाही. हे बरोबर आहे की, ज्या स्टेडियमवर वॉर्नने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती, त्याच मैदानात क्रिकेटजगत त्याचा सन्मान आणि त्याच्या जीवनाचा आनंद साजरा करण्यासाठी जमणार आहेत.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) फ्रँचायझीने वॉर्नच्या आठवणीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी त्याच्या कुटुंबीयांना आमंत्रित केले होते. शेन वॉर्नचा भाऊ जेसन वॉर्नने हे आमंत्रण स्वीकारले देखील आहे. जेसन वॉर्न ३० एप्रिल रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुंबईत दाखल होणार आहेत.
दरम्यान, शेन वॉर्च्या कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने ऑस्ट्रेलियासाठी १५ वर्षाच्या कारकिर्दीत एकूण १४५ कसोटी सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ७०८ विकेट्स आहेत. तसेच, एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील त्याने २९३ विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु वेगवेगळ्या टी२० लीगमध्ये तो खेळला आहे आणि यशस्वी सुद्धा झाला आहे. वॉर्नची कारकीर्द जरी एवढी मोठी असली, तरी त्याला ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मात्र बनता आले नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंचांसोबत वाद आणि राजस्थानविरुद्धचा पराभव पचवण्यासाठी लागले ‘एवढे’ दिवस, वॉटसनचा खुलासा
माजी भारतीय प्रशिक्षकाचा दावा; म्हणे, पंजाब किंग्जचा ‘हा’ युवा गोलंदाज टीम इंडियात बनवणार जागा
‘सीएसके त्याचे कुटुंब आहे, बंदी उठल्यानंतर आनंदात होता माही’, इंग्लंडच्या दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया