---Advertisement---

मुंबईच्या रंगात रंगले आरसीबीचे सोशल मीडिया हँडल; मॅक्सवेल, विराट अन् फाफही दिसले निळ्या जर्सीत, पाहा मिम्स

Royal-Challengers-Bangalore-And-Mumbai-Indians
---Advertisement---

आयपीएल २०२२मध्ये गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमधील त्यांचे स्थान पक्के केले आहे. आता चौथा संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यानंतर निश्चित होणार आहे. मुंबई इंडियन्स जरी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असता, तरी त्यांचे आजच्या सामन्यातील प्रदर्शन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी महत्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. आरसीबीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर देखील सर्वत्र निळा रंग दिसत आहे.

आयपीएल २०२२ हंगामाच्या साखळी फेरीतील १४ सामन्यांपैकी आरसीबीने ८ सामने जिंकले आहेत आणि १६ गुणांसह संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने साखळी फेरीतील १३ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत त्यांचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. शनिवारी रात्री दिल्लीला साखळी फेरीतील शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळत आहे. हा सामना जिंकल्यानंतर दिल्लीकडे देखील १६ गुण होतील आणि ते आरसीबीला मागे टाकून प्लेऑफमध्ये स्थान पक्के करू शकतात.

याच पार्श्वभूमीवर आरसीबीचे चाहते मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकावा, अशी प्रार्थना करत आहेत. दिल्लीने जर मुंबईला या सामन्यात पराभूत केले, तर आरसीबी आणि दिल्ली या दोन्ही संघांकडे प्रत्येकी १६ गुण असतील. पण नेट रन रेटच्या बाबतीत दिल्ली कॅपिटल्स आरसीबीला मात देईल आणि प्लेऑमध्ये स्थान पक्के करेल. दिल्लीचा नेट रन रेट पॉझिटिव्ह आहे, तर आरसीबीचे नेट रन रेट मात्र निगेटिव्ह आहे.

https://twitter.com/yuvrajdz_16/status/1527969896013111296?s=20&t=QZqbedIjB9GaTf3jry4ChQ

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

https://twitter.com/IshaaNegi17/status/1527911209269624834?s=20&t=UEdgXqkZUqscsukkriX6nw

आरसीबीचे चाहते मुंबईच्या विजयाची इच्छा व्यक्त करत आहेत, पण आरसीबीच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर देखील हीच इच्छा व्यक्त केली जात आहे. एरवी लाल रंगात दिसणारे आरसीबीचे प्रोफाईल, शनिवारच्या सामन्याआधी पूर्णपणे निळ्या रंगात रंगले आहे. आरसीबीचे दिग्गज ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये असल्याचे दिसत आहे. असेच अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

मुंबई-दिल्ली सामन्यावर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास आरसीबीचं काय होणार? बघा प्लेऑफचं गणित

आयपीएलचं टेन्शन विसरून श्रेयस अय्यर करतोय नुसता एंजॉय, बहिणीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी! मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ‘करो वा मरो’ सामन्यात दिल्लीच्या धडाकेबाज पठ्ठ्याचे कमबॅक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---