इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या २२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला धूळ चारली. चालू आयपीएल हंगामातील हा सीएसकेला मिळालेला पहिला विजय असून आरसीबीला या सामन्यात विजयासाठी २३ धावा कमी पडल्या. आरसीबीचा संपूर्ण संघ या सामन्यात जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला, तेव्हा प्रत्येक खेळाडूच्या हातावर एक काळ्या रंगाची पट्टी बांधलेली दिसली.
आरसीबीने (RCB) नाणेफेक जिंकून सीएसकेला (CSK) प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आरसीबी संघ जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला, तेव्हा सर्वाचे लक्ष त्यांच्यात हाताला बांधलेल्या काळ्या रंगांच्या पट्टीकडे गेले. ही काळ्या रंगाची पट्टी आरसीबीच्या प्रत्येक खेळाडूच्या दंडावर बांधलेली होती. अनेक चाहत्यांना खेळाडूंनी बांधलेल्या या पट्ट्यांचे कारण माहिती नव्हते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) सीएसकेविरुद्धच्या या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. हर्षल पटेलच्या बहिणीने अचानक या जगाचा निरोप घेतला, असल्यामुळे त्याला सीएसकेविरुद्धच्या या सामन्यासाठी उपलब्द राहता आले नाहीये. हर्षलवर या घटनेनंतर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हर्षलच्या या दुःखात त्याचे संघ सहकारीही सहभागी झाले. या अनपेक्षित घटनेनंतर हर्षलला आयपीएल २०२२चा बायो- बबल सोडावा लागला आणि तो घरी रवाना झाला.
मुंबई इंडियन्सविरुद्ध ८ एप्रिल रोजी आरसीबीने ७ विकेट्स राखून विजय मिळवला होता. मुंबई आणि आरसीबी यांच्यातील हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळला गेला होता आणि त्याच ठिकाणावरून हर्षलला ही वाईट बातमी समजल्यानंतर घरच्या दिशेने रवाना झाला. आता तो पुढच्या किती सामन्यांसाठी अनुपस्थित राहील, याविषयी कसलीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. मागच्या हंगामात हर्षल सर्वाधिक विकेट्ससह पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. चालू हंगामात देखील तो या कॅपसाठी दावेदार होता. पहिल्या चार सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या आहेत. चालू हंगामात श्रीलंकेचा वनिंदू हसरंगा १० विकेट्सह बेंगलोरसाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.
RCB players wearing black armband in honour of Harshal Patel's sister who passed away recently💔#RCBvCSK #CSKvsRCB #IPL #IPL2022 pic.twitter.com/0ejp4Wsdls
— Faiz Fazel (@theFaizFazel) April 12, 2022
सीएसके आणि आरसीबी यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने ४ विकेट्सच्या नुकसानावर २१६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबी मर्यादित २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावा करू शकला. परिणामी सीएसकेने २३ धावांनी विजय मिळवला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आरसीबीच्या गोलंदाजांना खणखणीत ९ षटकार चोपत रॉबिन उथप्पाचा मोठा विक्रम, दिग्गजांच्या यादीत झाला सामील
‘संघ योग्य दिशेने पुढे चाललाय, मलाही प्रभाव पाडायचाय’, दिल्लीच्या धाकड खेळाडूचं वक्तव्य
विरोधी संघांच्या ‘या’ फंड्यामुळे राशिद खानला मिळत नाहीयेत जास्त विकेट्स; स्वत:च सांगितले कारण