आयपीएल २०२२ चा सहावा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या डी वाय वाटील स्टेडियमवर खेळल्या गेगेल्या या सामन्यात आरसीबीने ३ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने या सामन्यात एक मोठा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे, जो यापूर्वी आयपीएलमध्ये फक्त एकदा घडला होता.
टी-२० क्रिकेटमध्ये एखादे षटक निर्धाव जाणे किंवा टाकणे ही सोपी गोष्ट नसते. कारण फलंदाज टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या षटकापासूनच धमाका करण्याच्या विचारात असतात. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त दोन वेळा असा कारनामा घडला आहे, जेव्हा एखाद्या गोलंदाजाने दोन निर्धाव षटके टाकली असतील. विशेष गोष्ट म्हणजे, या दोन गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे, ते दोन्ही गोलंदाज आरसीबीचे प्रतिनिधित्व करत होते आणि त्या सामन्यात आरसीबीसमोर केकेआरचे आव्हान होते.
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा एका गोलंदाजाने एका सामन्यात दोन निर्धाव षटके टाकण्याचा कारनामा २०२० मध्ये घडला होता. पहिल्यांदा ही कामगिरी आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने केली होती आणि केकेआरविरुद्ध हा सामना खेळला गेला होता. आता दुसऱ्यांदा ही कामगिरी २०२२ हंगामातील आरसीबी आणि केकेआर या सामन्यात घडली. आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) याने या सामन्यात टाकलेल्या त्याच्या ४ षटकांच्या कोट्यातील पहिली दोन्ही षटके निर्धाव टाकली आणि यामध्ये दोन महत्वाच्या विकेट्सही मिळवल्या. हर्षलने पहिली विकेट सॅम बिलिंग्सची घेतली, तर दुसरी विकेट आंद्रे रसलच्या रूपात मिळवली.
आयपीएल सामन्यात दोन निर्धाव षटके टाकणारे गोलंदाज
मोहम्मद सिराज – २०२० आयपीएल (आरसीबी विरुद्ध केकेआर)
हर्षल पटेल – २०२२ आयपीएल (आरसीबी विरुद्ध केकेआर)
दरम्यान सामन्याचा (RCB vs KKR) विचार केला, तर आरसीबीने या सामन्यात ३ विकेट्सने विजय मिळवला. चालू हंगामातील आरसीबीचा हा पहिला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने मर्यादित २० षटकांमध्ये १२८ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात आलेल्या आरसीबीने २० धावांच्या आतमध्ये त्यांच्या महत्वाच्या तीन विकेट्स गमावल्या होत्या, पण संघ अखेर शेवटच्या षटकात विजयी ठरला. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि हर्षल पटेल हे दोघे शेवटपर्यंत खेळपट्टीवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या –
सचिन, गांगुली आणि द्रविडने २५ वर्षांपूर्वी तोडले होते कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन
सचिनची २१ वर्षांपुर्वी पुण्यात १० हजार वनडे धावा करण्याची हुकली होती संधी