आयपीएल २०२२ च्या सहाव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आमने सामने होते. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला गेला आणि आरसीबीने यामध्ये ३ विकेट्स राखून विजय मिळवला. सामना शेवटच्या षटकापर्यंत खेळला गेला आणि अखेर आरसीबीने बाजी मारली. शेवटच्या षटकांमध्ये केकेआरला एक महत्वाची विकेट घेता आली नाही, परिणामी त्यांना पराभव पत्करण्याची वेळ आली.
आरसीबीचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिले आणि संघाला विजय मिळवून दिला. पटेलने ६ चेंडूत १० धावा केल्या, तर कार्तिकने ७ चेंडूत १४ धावा फटकावल्या.
आरसीबीच्या डावाच्या १९ व्या षटकात एक हास्यास्पद घटना घडली, जी पाहून चाहते लोटपोट झाले. या षटाकात वेंकटेश अय्यर गोलंदाजी करत होता. षटकातील दुसरा चेंडू कार्तिकने ऑफ साईडला खेळला आणि एक धाव घेण्यासाठी थोडा पुढे आला. कार्तिक धाव घेण्यासाठी पुढे आल्याचे पाहून नॉन स्ट्राइकवरील हर्षल पटेल सुसाट धावला. परंतु तितक्यात कार्तिकने निर्णय बदलला आणि तो मागच्या दिशेने वळला.
ताळमेळ नसल्यामुळे आरसीबीचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या एकाच बाजूला आल्याचे दिसले. असे असले तरीही, क्षेत्ररक्षक उमेश यादवने (Umesh Yadav) थ्रो चुकीच्या दिशेतला फेकला. उमेशने नॉन स्ट्राइकवर थ्रो फेकण्याऐवजी स्ट्राइक एंडवर फेकला. अशात कार्तिकला नॉन स्ट्राइकच्या दिशेने धावण्याची संधी मिळाली. नॉन स्ट्राइकर एंडवर फेकलेला चेंडू स्टंप्सला न लागल्यामुळे, कार्तिक वेगाने धावला आणि नॉन स्ट्राइकवर जाऊन पोहोचला. सुदैवाने कार्तिकने स्वतःची विकेट गमावली नाही.
🧐 #RCBvKKR pic.twitter.com/foKTzwmium
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) March 30, 2022
https://twitter.com/SportsHustle3/status/1509229430786629632?s=20&t=KmFnfZ2ooxdK82VMXMeVHg
निर्णायक क्षणी क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे ही महत्वाची विकेट केकेआरला मिळाली नाही. या प्रसंगानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि इतर सर्व खेळाडूंची चिंता वाढली. केकेआरने जर मिळालेल्या या संधीवर कार्तिक किंवा पटेल यांच्यातील एक विकेट घेतली असती, तर सामन्याचा निकाल वेगळा असू शकत होता.
महत्वाच्या बातम्या –
Video: अगग! पाकिस्तानी क्रिकेटरच्या मोठ्या चूकीनंतरही ऑस्ट्रेलियाचा अर्धशतकवीर दुर्देवीरित्या धावबाद
सचिनची २१ वर्षांपुर्वी पुण्यात १० हजार वनडे धावा करण्याची हुकली होती संधी
जिंकली बेंगलोर पण चर्चा कोलकाताच्या हुकमी गोलंदाजाची, IPL इतिहासात नोंद होणारा केला रेकॉर्ड