---Advertisement---

दिग्गजांचा सहभाग असलेल्या महत्वाच्या यादीत रजत पाटीदार नव्याने सामील, पाहा काय आहे विक्रम

Rajat-Patidar-And-Dinesh-Karthik
---Advertisement---

बुधवारी (२५ मे) आयपीएलचा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. उभय संघातील या सामन्यात आरसीबीचा वरच्या फळीतील फलंदा रजत पाटीदारने जबरदस्त प्रदर्शन केले. राजस्थानने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. पाटीदारच्या नाबाद ११२ धावांच्या जोवावर त्यांच्या संघाने मर्यादित २० षटकात २०७ धावा उभ्या केल्या. या ताबडतोड फलंदाजीनंतर पाटीदारने काही महत्वाचे विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत.

आयपीएल २०२२मधील सर्वात वेगवान शतक आता पाटीदारच्या नावावर झाले आहे. अवघ्या ४९ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी करणाऱ्यांच्या यादीत देखील रजत पाटीदार (Rajat Patidat) नव्याने सहभागी झाला आहे. प्लेऑफच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे, ज्याने १२२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर नाबाद ११७ धावांसह शेन वॉटसन आहे.

https://twitter.com/RCBTweets/status/1529500877135958017

तिसऱ्या क्रमांकावरील वृद्धिमान साहा आहे, ज्याने प्लेऑफच्या एका सामन्यात नाबाद ११५ धावा ठोकल्या होत्या. ११३ धावांची खेळी करणार मुरली विजय यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आता पाचव्या क्रमांकावर पाटीदार नव्याने सहभागी झाला आहे, ज्याने अवघ्या ५४ चेंडूत नाबाद ११२ धावांची खेळी केली आहे. पाटीदारच्या या खेळीमध्ये १२ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे.

आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यात सर्वात मोठी खेळी करणारे खेळाडू
१२२ – विरेंद्र सेहवाग विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
११७* – शेन वॉटसन विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
११५* – वृद्धिमान साहा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
११३ – मुरली विजय विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स
११२* – रजत पाटीदार विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स*

दरम्यान, उभय संघातील या एलिनिनेटर सामन्याचा विचार केला, तर प्रथम लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ४ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या. यामध्ये पाटीदारव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचे योगदान देखील महत्वाचे ठरले. कार्तिकने २३ चेंडूत नाबाद ३७ धावा ठोकल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

षटकार अन् चौकारांचा पाऊस पाडत पाटीदारने काढला लखनऊच्या गोलंदाजांचा घाम, सेहवागच्या विक्रमालाही दिला छेद

याला काय अर्थय! एलिमिनेटर सामन्यात आरसीबीच्या कॅप्टनचा फ्लॉप शो, धोनी- रोहितनंतर फाफची नकोशी कामगिरी

नाद नाद नादच! रजत पाटीदारने गाजवली आयपीएल, लखनऊविरुद्ध ४९ चेंडूत शतक ठोकत रचला भीमपराक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---