आयपीएल २०२२ ची सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिला डबल हेडर रविवारी २७ मार्च रोजी खेळला जाईल. डबल हेडरचा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरतील. पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अगरवाल असेल. तसेच आरसीबीची कमान फाफ डू प्लेसिसच्या हातात असेल. चला तर जाणून घेऊया या सामन्याच्या ड्रीम ११ मध्ये कोणत्या खेळाडूंना निवडू शकतो.
यष्टीरक्षक
या सामन्यासाठी यष्टीरक्षकाच्या रूपात जॉनी बेयरस्टो आणि दिनेश कार्तिक यांना संघात सामील केले जाऊ शकते. कार्तिकने १९८ आयपीएल सामन्यांमध्ये ३७५८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १२९.५० होता. तो संघासाठी वेगात धावा करू शकतो. दुसरीकडे जॉनी बेयरस्टोलाही संघात ठेऊ शकता. त्याने २८ आयपीएल सामन्यांमध्ये १४२ च्या स्ट्राइक रेटने १०३८ धावा केल्या आहेत.
फलंदाज
ड्रीम ११ मध्ये फलंदाजी विभागात विराट कोहली, शाहरुख खान, मयंक अगरवाल आणि महिपाल लोमरोर यांची निवड करू शकतो. आरसीबीसाठी विराटने २०७ सामन्यांमध्ये सर्वाधिक ६२८३ धावा केल्या आहेत. या धावा त्याने १२९.५५ च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत. तसेच शाहरुख खान पंजाब किंग्जसाठी खेळताना दिसेल, जो अलिकडच्या काळात कमाल फलंदाजी करत आहे. आयपीएमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १३४.२१ आहे. पंजाब किंग्जचा नवीन कर्णधार मयंक अगरवालने आतापर्यंत खेळलेल्या १०० आयपीएल सामन्यांमध्ये १३५.४७ च्या स्ट्राइक रेटने २१३१ धावा केल्या आहेत. महिपाल लोमरोरला मोठे शॉट खेळण्यासाठी ओळखले जाते.
अष्टपैलू
अष्टपैलूंमध्ये वानिंदु हसरंगा आणि ओडियन स्मिथ यांना संघात सामील केले जाऊ शकते. आरसीबीने १ कोटी बेस प्राईसवाल्या हसरंगाला संघात सामील करण्यासाठी १०.७५ कोटी खर्च केले. हसरंगाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३४ सामन्यात ५५ विकेट्स घेतल्या आहेत. तो फलंदाजीतही मोठे षटकार मारू शकतो. तसेच ओडियन स्मिथचा विचार केला, तर त्याने नुकतेच भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीने महत्वाचे योगदान दिले आहे.
गोलंदाज
गोलंदाजी विभागात हर्षल पटेल, राहुल चाहर आणि अर्शदीप सिंग यांना ड्रीम ११ मध्ये सामील केल जाऊ शकते. मागच्या हंगामातील १५ सामन्यांमध्ये हर्षल पटेलने ३२ विकेट्स घेऊन पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. मुंबई इंडियन्ससाठी खेळताना राहुलने ११ सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या होत्या. अर्शदीप सिंगला या हंगामात पंजाब किंग्जने रिटेन केले आहे, कारण त्याने १२ सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या –
विराटने ६ वर्षांपूर्वी त्याला ‘किंग कोहली’ का म्हणतात याच प्रात्यक्षिक दिलं होतं, पाहा व्हिडिओ
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला २८ वर्षांपुर्वी ‘या’ खेळाडूने केले होते ओपनर
चाळीसाव्या वर्षी धोनीची दहाड! चौकारांनी केली कमाल; उडविले मिनी हेलिकॉप्टर