---Advertisement---

‘लय पनवतीये तू…’, माजी दिग्गजाने ट्वीट करताच विराट शून्यावर झाला बाद; मग चाहत्यांनीही केले जोरदार ट्रोल

On: रविवार, एप्रिल 24, 2022 5:29 PM
Virat-Kohli
---Advertisement---

शनिवारी (२३ एप्रिल) खेळल्या गेलेल्या डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सामना सनरायझर्स हैदराबादसोबत झाला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. भारताचा आणि आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. दुसरीकडे विराट गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर हरभजन सिंग मात्र नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

सनरायझर्स हैदराबाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १६.१ षटकात ६८ धावा केल्या आणि त्यांचा संपूर्ण संघ गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात हैदराबादने हे लक्ष्य एक विकेटच्या नुकसानावर आणि अवघ्या ८ षटकात गाठले. विराट कोहली (Virat Kohli) सलग दुसऱ्या सामन्यात खाते न उघडता तंबूत परतला. असे असले, तरीही माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) याला विराटवर मैदानात येण्यापूर्वी पूर्ण विश्वास होता. विराटचा डाव सुरू होण्याच्या ठीक आधी हरभजनने एक ट्वीट केले. ट्वीटमध्ये त्याने भविष्यवाणी केली की, विराट आज चांगले प्रदर्शन करणार आहे, पण त्याची ही भविष्यवाणी अकदी चुकीची ठरली.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ट्वीटमध्ये हरभजनने लिहिले की, “मला वाटत आहे की, विराट कोहलीसाठी मैदानात आज चांगला दिवस असेल. तो एक मजबूत खेळी करून टीकाकारांना शांत करेल.” हरभजनच्या या ट्वीटनंतर विराट मैदानात आला आणि पहिल्या चेंडूवर विकेट गमावली. मार्को जेन्सनने आरसीबीच्या डावात दुसरे षटक टाकले आणि तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिस, विराट कोहली आणि सलामीवीर अनुज रावत यांनी या षटकात विकेट्स गमावल्या. परिणामी आरसीबीला पुढे मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.

विराटने विकेट गमावल्यानंतर हरभजनची भविष्यवाणी खोटी तर ठरलीच, पण नेटकऱ्यांना त्याला ट्रोल करण्यासाठी साधनच मिळाले. एका नेटकऱ्याने लिहिले की, “कृपया तू शांत राहा.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने थेट हरभजन ‘एक पनवती’ असल्याचे म्हणले. हरभजनच्या झालेल्या फजितीनंतर नेटकरी त्याला चांगलेच ट्रोल करत आहेत.

https://twitter.com/Shantanu630/status/1517868574408282112?s=20&t=6EwLSFjiDnt4B8oCA2LzxQ

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

KKRvsGT: ‘टेबल टॉपर’ गुजरातच्या कॅप्टन हार्दिकची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘टूर्नामेंट संपेपर्यंत माझे केस पांढरे होतील’

सचिन ९२वर खेळतोय रे…!!

सचिनला लाडक्या लेकाकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाला, ‘माझ्यासाठी जे काही केले आहे…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---