आयपीएल २०२२ साठी रिटेन करण्यात आलेल्या २७ खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार एमएस धोनीसह ४ खेळाडूंना रिटेन केले आहे. मात्र, धोनी सीएसकेच्या रिटेन यादीत दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. त्याला फक्त १२ कोटी रुपये मिळतील. रवींद्र जडेजाला सर्वाधिक १६ कोटी रुपये दिले जातील. धोनीचे मानधन रिटेन केलेल्या ५ खेळाडूंपेक्षा कमी आहे. त्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचाही समावेश आहे.
संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सकडून १४ कोटी मिळणार आहेत. केकेआरने आंद्रे रसेलला १२ कोटी दिले आहेत. म्हणजेच धोनी इतकीच रक्कम त्याने घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार रिषभ पंतला १६ कोटींमध्ये, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला १४ कोटींमध्ये, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला १६ कोटींमध्ये, तर आरसीबीने विराट कोहलीला १५ कोटींमध्ये कायम केले आहे.
एमएस धोनीने रिटेन्शनपूर्वी सांगितले होते की, त्याला शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळायचा आहे. आयपीएल २०२२ चे सामने भारतातच होणार आहेत. आयपीएल २०२० मधील खराब कामगिरीनंतर धोनीच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, त्याने २०२१ मध्ये संघाला विजेतेपद मिळवून देत सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली. सीएसके संघाने मागील वर्षी चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. मुंबईने सर्वाधिक ५ वेळा आयपीएलच्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
आयपीएल २०२२ पासून ८ ऐवजी १० संघ मैदानात उतरतील. आठ संघांनी आपली रिटेंशन यादी जाहीर केल्यानंतर, आता दोन नवीन संघ त्यांच्यासोबत ३-३ खेळाडू जोडू शकतील. पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलला लखनौ फ्रॅंचायझीकडून २० कोटी मिळू शकतात. अशा स्थितीत तो सर्वात महागडा खेळाडू ठरू शकेल.
चेन्नई सुपर किंग्सने रिटेन केलेले खेळाडू
रवींद्र जडेजा – १६ कोटी
महेंद्रसिंग धोनी – १२ कोटी
मोईन अली – ८ कोटी
ऋतुराज गायकवाड – ६ कोटी