---Advertisement---

केकेआरला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवणारा रिंकू सिंग पराभवानंतर भावूक, फोटो तोडेल तुमचेही हृदय!

Rinku-Singh-Gets-Emotional
---Advertisement---

आयपीएल २०२२ हंगाम दिवसेंदिवस अधिक रंजक बनत चालला आहे. बुधवारी (१८ मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात एक थरारक सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. केकेआरच्या रिंकू सिंगने शेवटच्या षटकात लखनऊ संघाचा चांगलाच घाम काढला होता, पण तो स्वतःच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सामना गमावल्यानंतर केकेआरचा प्रत्येक खेळाडू भावूक झाला होता, पण रिंकूच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती.

प्रथम फलंदाजी करताना लखनऊचे सलामीवीर क्विंटन डी कॉक (७० चेंडूत १४०* धावा) आणि केएल राहुलने (५१ चेंडूत ६८* धावा) संघाला २१० धावा उभ्या करून दिल्या. लखनऊने एकही विकेट न गमावता या धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले, पण त्यानंतर केकेआरच्या प्रत्येक खेळाडूने महत्वाचे योगदान दिले.

शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी २१ धावांची आवश्यकता होती. रिंकू सिंग (Rinku Singh) शेवटच्या षटकात चमकला आणि त्याने पहिल्या चार चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. शेवटच्या दोन चेंडूत त्यांना ३ धावांची गरज होती, पण तेव्हाच रिंकू झेलबाद झाला. एविन लुईसने त्याचा उत्कृष्ट झेल घेतला. मार्कस स्टॉयनिसने शेवचच्या चेंडूवर उमेश यादवला शून्यावर बाद केले आणि लखनऊला प्लेऑफमध्ये पोहोचवले.

पराभवानंतर केकेआर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. केकेआरचे सर्व खेळाडू निराश होते, पण सर्वात जास्त जर कोणता खेळाडू निराश असेल, तर तो रिंकू सिंग होता. त्याच्याकडे  पाहिल्यानंतर असे वाटत होते की, पराभवानंतर त्याला अश्रू अनावर झाल्यासारखे दिसत होते. सामना संपल्यानंतरचे त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/cricketthirteen/status/1527025049567645696?s=20&t=EzOUb_JX8HQ2-zmIOu6PxA

दरम्यान, हंगामातील रिंकूच्या प्रदर्शनावर नजर टाकली, तर सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. जेव्हा त्याला संधी मिळाली, तेव्हा त्याने स्वतःला सिद्ध केले. हंगामात त्याने ७ सामने खेळले, ज्यामध्ये ३४.८० च्या सरासरीने आणि १४८.७१ च्या स्ट्राईक रेटने १७४ धावा केल्या. रिंकून चालू हंगामात आतापर्यंत एकूण १७ चौकार आणि ७ षटकार ठोकले आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्याची बदलली वेळ, ७.३० ऐवजी ‘या’ वेळी सुरू होणार थरार

आरसीबीसाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती, प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी ‘हा’ आहे उपाय

‘हा गोलंदाज लवकरच भारताच्या जर्सीत दिसेल, कर्णधार केएल राहुलने केले आपल्या ताफ्यातील युवा खेळाडूचे कौतुक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---