शुक्रवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एक रोमहर्षक सामना चाहत्यांना पाहायला मिळाला. जोस बटलरच्या शतकी खेळीच सर्वत्र कौतुक होत असताचा रिषभ पंतची देखील चर्चा होत आहे. पंतने सामन्याच्या शेवटच्या षटकात सामना थांबण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला या सामन्यासाठी मिळणारी १०० टक्के रक्कम कापली गेली आहे.
अशात रिषभ पंत (Rishabh Pant) याला त्याने शेवटच्या षटकात उचललेल्या एका चुकीच्या पावलामुळे जवळपास १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे नुकसान सोसावे लागले आहे. रिषभ पंतव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरची देखील ५० टक्के सामना फी कापली गेली आहे. प्रशिक्षक प्रवीण आमरे यांना सामन्यादरम्यान मैदानात गेल्यामुळे पुढच्या सामन्यात बंदी घातली गेली आहे.
पंतला का भरावा लागणार दंड?
दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या षटकात विजयासाठी ३६ धावांची गरज होती. पहिल्या तीन चेंडूंवर रोवमन पॉवेलने षटकार ठोकले. तिसरा चेंडू कमरेच्या वरती फुलटॉस होता. पंत आणि दिल्लीच्या खेळाडूंच्या मते हा नो बॉल पाहिजे होता, पण पंचांनी मात्र चेंडू योग्य असल्याचे सांगितले. पंचांच्या या निर्णयाशी सहमती न दाखवल्यामुळे पंतवर ही कारवाई केली गेली आहे.
मोजावी लागणार ‘एवढी’ रक्कम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर असा काही प्रकार घडला, तर ५, १० किंवा १५ लाख रुपयांचा दंड खेळाडूंना भरावा लागू शकतो, परंतु आयपीएलमध्ये परिस्थिती वेगळी आहे. दिल्ली कॅपिटल्सने पंतसाठी या आयपीएल हंगामात १६ कोटी रुपये मोजले आहेत. लीग स्टेजच्या १४ सामन्यांसाठी ही रक्कम गृहीत धरली जाते. अशात एका सामन्यासाठी पंतला दिल्ली फ्रँचायझीकडून १.१४ कोटी रुपये दिले जात आहेत. त्यामुळे एका सामन्याची सामना फी कापली गेली, तर त्याला तब्बल १.१४ कोटी रुपयांचे नुकसान होणे निश्चित आहे.
https://twitter.com/Twinkle_Agrawl/status/1517692446896918528?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517692446896918528%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Frishabh-pant-and-sanju-samson-statement-on-no-ball-controversy-during-dc-vs-rr-match%2F
वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) देखील पांच्यांच्या निर्णयावर नाखुश दिसला होता. याच कारणास्तव त्याची ५० टक्के सामना फी कापली गेली आहे. मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला १०.७५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होती. अशात एका सामन्यासाठी फ्रँचायझी शार्दुलला ७७ लाख रुपये देत आहे. याची ५० टक्के रक्कम म्हणजेच ३८.५ लाख रुपये शार्दुलला मोजावे लागले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूमुळे रिषभने मैदानातील वातावरण तापवले असले, तरी दिल्ली कॅपिटल्सला त्याचा कसलाही फायदा झाल्याचे दिसले नाही. एका षटकात ६ षटकार मारणे सोपी गोष्ट नसली, तरी पॉवेलने ज्या पद्धतीने पहिले तीन षटकार मारले, ते पाहता पुढे काहीही होऊ शकत होते. परंतु पंतने मध्ये वेळ घेतल्यामुळे पॉवेल ज्या लयीत खेळत होता, तो नक्कीच बिघडला. परिणामी २२२ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला १५ धावांनी पराभव पत्करावा लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नो बॉल विवादावरून प्रशिक्षक वॉटसनचा दिल्ली संघालाच घरचा आहेर; म्हणाला, ‘हे स्विकाहार्य नाही’
DC vs RR। वातावरण इतकं तापलं तरीही तिसऱ्या पंचांकडे का गेला नाही निर्णय? जाणून घ्या एका क्लिकवर
तिकडे नो बॉलचा वाद सुरू होता अन् इकडे कुलदीपलाच भिडला चहल; Video जोरदार व्हायरल