---Advertisement---

रोहितच्या शानदार सिक्सरमुळे काझीरंगातील गेंड्यांना ५ लाखांची मदत; कशी ते एका क्लिकवर घ्या जाणून

Rohit-Sharma-IPL
---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला वन्यजीवांच्या खूप जवळचे मानले जाते. त्याने अनेकदा त्यांच्या संरक्षणासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या अभियानांमध्ये सहभाग घेतला आहे. शुक्रवारी (६ मे) गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने मारलेल्या एका षटकारामुळे आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला पाच लाख रुपयांची मदत मिळाली.

आसाममध्ये आढळणारा एका शिंगाडा गेंडा (Rhinos) काझीरंगाला रोहितच्या या षटकारामुळे पाच लाख रुपयाची मदत मिळाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने डावाच्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेने हा षटकार मारला. कॅरेबियन गोलंदाज अल्जारी जोसेफ (Alzarri Joseph) या षटकात गोलंदाजी करत होता. त्याने टाकेलला या चेंडूला चांगलीच गती होती, पण रोहितने तो सहज सीमारेषेपार पाठवला. सीमारेषेपार टाटा मोटर्सची पंच (Tata Punch) गाडी उभी होती आणि रोहितने मारलेला चेंडू याच गाडीवर जाऊन पडला. याच कारणास्तव आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला (Kaziranga National Park) पाच लाख रुपयांची देणगी मिळाली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

टाटा मोटर्स आयपीएल २०२२ चे अधिकृत स्पॉन्सर्स आहेत. टाटा मोटर्सने चालू हंगामासाठी घोषणा केली होती की, जर एखाद्या फलंदाजाने मारलेला शॉट टाटा पंचच्या पोस्टर किंवा सीमारेषेजवळील गाडीवर जाऊन लागला, तर कंपनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला पाच लाख रुपयांची देणगी देईल. आसाममधील हे उद्यान एका शिंगाच्या गेंड्याचे घर म्हणून ओळखले जाते. अशाप्रकारे रोहितच्या या  षटकारामुळे फक्त मुंबई इंडियन्सच नाही, तर वन्यजीवांना देखील मदत मिळाली.

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुबई इंडियन्सचे सलामीवीर रोहित शर्मा (२८ चेंडूत ४३ धावा) आणि इशान किशन (२९ चेंडूत ४५ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली आणि संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. असे असले तरी मध्यक्रमातील फलंदाज सलामीवीरांच्या तुलनेत अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. मुंबई इंडियन्सने मर्यादित २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसनावर १७७ धावा उभ्या केल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

शेवटी रोहितची बॅट तळपलीच! विस्फोटक फलंदाजी करत ‘हिटमॅन’ बनला मुंबईचा दुसरा ‘सिक्सर किंग’

‘असे’ आहे आयपीएल २०२२च्या प्लेऑफचे समीकरण, जाणून घ्या कोणत्या चार संघांना मिळू शकते स्थान

‘तू पुढच्या वर्षी गुजरातमध्ये येऊ शकतो’, हार्दिक पंड्याची मुंबईच्या जुन्या सहकाऱ्याला खुली ऑफर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---