शनिवारी (७ मे) खेळल्या गेलेल्या आयपीएल२०२२ च्या डबल हेडरमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात पार पडला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्सने विजय मिळवला. विजयानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने संघातील खेळाडूंचे कौतुक करत खास प्रतिक्रिया दिली.
या विजयानंतर राजस्थान गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आला होता. पण शनिवारचा दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कोलकातना नाईट रायडर्सचा पराभव केला आणि गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला. परिणामी राजस्थान रॉयल्स संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जयसवालप्रमाणेच सॅमसनने युजवेंद्र चहलचे देखील कौतुक केले. चहलने या सामन्यात तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तो म्हणाला की, “अशी कोणतीच रणनीती नाहीये की, वेगवान गोलंदाजाला शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करावी लागते. मला वाटते कोणीही, जो चांगल्या स्वभावाचा आणि अनुभव असणारा खेळाडू संघासाठी हे काम करू शकतो. तो (चहल) २० वे षटक करण्यासाठी देखील तयार आहे.”
सॅमसनने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. यावषयी बोलताना सॅमसन म्हणाला की, “तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करून मला स्वतःला अभिव्यक्त करायचे होते आणि काही आवडते शॉट्स खेळायचे होते. मजा आली.” दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सॅमसनने या सामन्यात १२ चेंडूत २३ धावा केल्या.
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने ५ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने ४ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.४ षटकात हे लक्ष्य गाठले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्सकडून मिळालेला पराभव मयंक अगरवालच्या जिव्हारी; म्हणाला, ‘ते आम्हाला जमले नाही…’
क्या बात है! फक्त ३ खेळाडूंनाच जमला आयपीएलमध्ये ‘हा’ भन्नाट विक्रम, सुनील नारायणचाही समावेश
रबाडाला ‘बच्चा’ समजणे बटलरला पडले महागात, पहिल्या ५ चेंडूवर चोपल्यानंतर गोलंदाजाने ‘असा’ काढला काटा