आयपीएल २०२२ च्या पाचव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमने-सामने होते. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभव स्वीकारावा लागला. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघाने सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि २१० धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी २११ धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु त्यांचा संघ ६१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाला. कर्णधार संजू सॅमसनची खेळी कौतुकास पात्र ठरली.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hydarabad) संघाचे फलंदाज नक्कीच पूर्णपणे अपयशी ठरले, पण राजस्थानच्या फलंदाजांनी मैफिल लुटली. संजू सॅमसन (Sanju Samson) याची फलंदाजी कर्णधारपदाला साजेशी होती. पुण्यामध्ये कर्णधार सॅमसनने षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला.
सॅमसनने हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात २७ चेंडू खेळले आणि यामध्ये ५५ धावा करून चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. अवघ्या २५ चेंडूत त्याने स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत ३ चौकार आणि त्यापेक्षा जास्त म्हणजेच ५ षटकारांचा समावेश आहे. हे मोठे फटके मारताना संजू सॅमसनची गुणवत्ता संपूर्ण जगाने पाहिली. त्याच्या षटाकारांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
https://twitter.com/VarunSharma_27/status/1508836287456833537?s=20&t=BWusaA1l1TfYtLcZ9HQB2Q
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा केल्या.
प्रत्युत्तरात हैदराबात संघाने निराशाजनक प्रदर्शन केले. हैदराबाद त्यांच्या पॉवर प्लेमध्ये जवळपास पराभूत झाला होता. ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. पॉवर प्लेच्या ६ षटकांमध्ये त्यांनी तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्या आणि अवघ्या १४ धावा करू शकते. यानंतर त्यांच्या संघ सामन्यात पुनरागमन करू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या –
राजस्थानविरुद्धच्या पराभवासोबतच हैदराबादच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाचीही नोंद; वाचा सविस्तर
अर्रर्र! विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये ४०० कोटींची घसरण, तर ‘माही’ने घेतली मोठी झेप