मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर शुक्रवारी (२२ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने चांगलाचा गोंधळ निर्माण केला होता. राजस्थान रॉयल्सने टाकलेल्या शेवटच्या षटकात पंचांनी कमरेच्या वरच्या फुलटॉस चेंडूला नो बॉल करार दिला नाही. याच कासणास्तव पंत संतापला. पंतने सामना सुरू असताना खेळाडूंना मैदान सोडण्याचा इशारा तर दिलाच, पण सामना संपल्यावर देखील तो पंचांसोबत वाद घातलाना दिसला.
दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात ३६ धावांची आवश्यकता होती. स्ट्राईकवर असलेल्या रोवमन पॉवेलने पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार देखील मारले, पण तितक्यात रिषभ पंत (Rishabh Pant) सामना थांबवण्याच्या प्रयत्नात दिसला. पंतच्या मते षटकातील तिसरा चेंडू कमरेच्या वर फुलटॉस आला होता आणि नियमांप्रमाणे तो नो बॉल असायला हवा. परंतु पंचांनी हा चेंडू नो बॉल दिला नाही. या वादादरम्यान पॉवेलला सापडलेला सापडलेला लय मात्र बिघडला. राहिलेल्या तीन चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सला अवघ्या २ धावा मिळाल्या. परिणामी दिल्लीने १५ धावांनी पराभव पत्करला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
असे असले, तरी कर्णधार रिषभ पंतचा पंचांवरील राग मात्र शांत झाला नव्हता. पंतने सामना संपल्यानंतर पंचांना धारेवर धरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पराभवानंतर पंत पंचांसोबत सीमारेषेच्या जवळ उभा राहून विवाद घालताना दिसला होता. पंतच्या या वागणुकीमुळे त्याला या सामन्यासाठी मिळणारी १०० टक्के रक्कम दंडाच्या स्वरूपात आकारली गेली. चाहत्यांकडून देखील पंतच्या या वर्तणुकीची निंदा केली जात आहेत. क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांनी देखील पंतचे हे वागणे योग्य नसल्याचे सांगितले आहे.
Watched the match live in stadium!!!!
Crowd goes absolute bonkers over “no ball” and chanted “cheater cheater” in Wankhede!!
The clip of Rishabh Pant post match anger with Umpires#DCvsRR #cheater #RishabhPant #IPL2022 #ipl #noball #RR #wankhede #HallaBol #bcci # pic.twitter.com/RcrBlxVgxE
— Aman Jain (@amanj0104) April 22, 2022
दिल्ली आणि राजस्थन संघातील या सामन्याचा विचार केला, तर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २ विकेट्सच्या नुकसानावर तब्बल २२२ धावा उभ्या केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला ८ विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा करता आल्या. जोस बटलरने राजस्थानसाठी हंगामातील वैयक्तिकत तिसरे शतक केले. या प्रदर्शनासाठी बटलर सामनावीर ठरला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या एका नियमाने उडवली रिषभ पंतची झोप; वादामुळे बसला थेट कोट्यावधी रुपयांना फटका