इंग्लंडचा पुढील कसोटी कर्णधार बनण्याच्या बातम्यांवर स्टोक्सची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी एवढंच सांगेल की…’

इंग्लंडचा पुढील कसोटी कर्णधार बनण्याच्या बातम्यांवर स्टोक्सची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, 'मी एवढंच सांगेल की...'

जो रूटने काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. रुट मागच्या मोठ्या काळापासून टीकाकारांच्या निशाण्यावर होता. आता अखेर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. रुटनंतर इंग्लंडचा नवीन कसोटी कर्णधार म्हणून बेन स्टोक्सच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अशाता आता स्टोक्सने या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. स्टोक्सच्या मते कर्णधारपदाचा निर्णय इंग्लंड आणि वेस्ट क्रिकेट बोर्डचे नवीन मॅनेजिंग डायरेक्टर रॉब की यांच्या हातात असेल.

इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू स्टोक्सला वाटते की, जर त्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, तर ही सन्मानाची गोष्ट असेल. माध्यमांशी बोलताना बेन स्टोक्स (Ben Stokes) म्हणाला की, “मला माहिती आहे की, या संदर्भात खूप सारे अंदाज बांधले जात आहे की, कोण पद सांभाळेल आणि उपकर्णधार कोण असेल. मात्र, मी फक्त एवढेच म्हणेल की, कर्णधारपद खूप मोठा सन्मान आहे आणि जो कोणी ही जबाबदारी घेईल, त्याला संघाला पुढे घेऊन जाण्याच्या प्रयत्नाचा आनंद घेता येईल. क्रिकेटच्या नवीन मॅनेजिंग डायरेक्टरच्या रूपात रॉब यांना निर्णय घ्यावा लागेल. मला विश्वास आहे की, आम्ही लवकरच याविषयी चर्चा करू.”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“कसोटी क्रिकेटच्या नवीन युगाची सुरुवात, आम्हा सर्वांसाठी एक रोमांचक वेळ आहे. मी आता नेट्समध्ये पुनरागमन केले आहे. पुढचे काही आठवडे डरहमसाठीच्या पहिल्या सामन्याआधी प्रशिक्षण घेत आहे,” असेही स्टोक्स पुढे बोलताना म्हणाला. स्टोक्सने असे सांगितले की, ज्यादिवशी रुटने कर्णधारपद सोडण्याची माहिती त्याला दिली, तेव्हा तो थोड्या वेळासाठी विचारात पडला होता.

मागच्या काही वर्षात जो रूट (Joe Root) टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने खेळलेल्या मागच्या १७ कसोटी सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍशेस मालिकेत इंग्लंडचा ०-४ असा पराभव पत्करावा लागला होता. तसेच, वेस्ट इंडिजकडून ०-१ असा पराभव देखील संघाने स्वीकारला होता. असे असले, तरी त्याचे वैयक्तिक प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. मागच्या वर्षी आयसीसीने त्याला सर्वोत्तम कसोटी खेळाडूचा पुरस्कार देखील दिला होता.  कर्णधारपद सोडल्यानंतर रुट आता स्वतःच्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करताना दिसेल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

DC vs RR। वातावरण इतकं तापलं तरीही तिसऱ्या पंचांकडे का गेला नाही निर्णय? जाणून घ्या एका क्लिकवर

डेविड वॉर्नरने हद्दच पार केली! आऊट झाल्यानंतर केली अशी कृती, Video पाहून घ्या समजून

IPL 2022 | प्लेऑफमध्ये पोहोचू शकतील का चेन्नई आणि मुंबई संघ? जाणून घ्या उभय संघांची समीकरण

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.