आयपीएलच्या मैदानात बुधवारी (११ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा रंगतदार सामना पाहायला मिळाला. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्या फलंदाजीमध्ये लक्षणीय सुधारणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात त्याने राजस्थान रॉयल्ससाठी उत्कृष्ट फलंदाजी केली आणि अर्धशतक देखील पूर्ण केले. अश्विनची फलंदाजी कौतुकास नक्कीच पात्र आहे, पण अजून एक गोष्ट होती, ज्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
फलंदाजीमध्ये केलेल्या सुधारणेच्या जोरावर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आयपीएलच्या चालू हंगामात गोलंदाजी अष्टपैलूच्या भूमिकेत खेळत आहे. राजस्थानचे प्रतिनिधित्व करताना त्याने बुधवारी (११ मे) दिल्लीविरुद्ध ३८ चेंडूत वैयक्तिक ५० धावा केल्या. अश्विनच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी आयपीएल खेळी ठरली. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये एकही अर्धशतक केले नव्हते. याव्यतिरिक्त अजून एक बाब अशी होती, ज्यामुळे अश्विनने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अश्विन फलंदाजी करत असतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते आणि नेटकरी त्याच्या फलंदाजीच्या ऍक्शनविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अश्विन फलंदाजी करताना खूपच खाली वाकला होता. त्याचे गुडघे आर्ध्या पेक्षा जास्त दुमडलेले आहेत. एखादा खेळाडू जेव्हा खेळपट्टीवर फलंदाजी करत असतो, तेव्हा क्वचितच असे चित्र चाहत्यांनी यापूर्वी कधी पाहिले असेल. अश्विनची हीच एक्शन पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
https://twitter.com/patidarfan/status/1524404788741701633?s=20&t=fOTyIicRQHYRIG_XjkZpkg
https://twitter.com/ImRo745/status/1524403925712998401?s=20&t=-Dgg5_05tGjm0cX7sovhbA
Stance by Ravi Ashwin. pic.twitter.com/pwbCTe7j31
— Johns. (@CricCrazyJohns) May 11, 2022
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर अश्विनने राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने हे अर्धशतक करण्यासाठी ४ चौकार आणि २ षटकार देखील ठोकले. अश्विननंतर देवदत्त पडिक्कल राजस्थान संघासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. पडिक्कलने ३० चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १६० धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी चेतन साकरीया, एन्रीच नॉर्किया आणि मिचेल मार्च यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! सीएसकेचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर
सासवड एफसीचे जुन्नरविरुद्ध आठ गोल
पुन्हा आयपीएलमध्ये दिसणार ‘मिस्टर ३६०’ची जादू, विराटने दिलेत डिविलियर्सच्या पुनरागमनाचे संकेत