---Advertisement---

रियान पराग निघाला राजस्थानचा ‘डॉन’, दिल्लीच्या घातक गोलंदाजाच्या भेदक चेंडूवर मारला ९६ मीटरचा षटकार

On: बुधवार, मे 11, 2022 11:48 PM
---Advertisement---

बुधवारी (११ मे) आयपीएल २०२२ चा ५८ वा सामना मुंबईच्या डी पाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने होते. या सामन्यात राजस्थानचा फलंदाज रियान पराग मोठी खेळी करू शकला नाही, पण त्याने मारलेल्या एका शॉटमुळे तो चर्चेत आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात रियान पराग (Riyan Parag) याच्या बॅटमधून अवघ्या ९ धावा निघाल्या. या छोट्याशा खेळीमध्ये रियानने एक उत्कृष्ट षटकार मारला. हा षटकार रियानने एन्रीच नॉर्किया (Anrich Nortje) गोलंदाजी करत असताना मारल्यामुळे त्याला अधिक महत्व प्राप्त झाले. राजस्थानने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. राजस्थानच्या डावातील १७ व्या षटकात नॉर्किया गोलंदाजीसाठी आला. या षटकातील चौथा चेंडू रियानने कसलाही विचार न करता षटकारासाठी खेळला आणि तो थेट सीमारेषेपार जाऊन पडला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

एन्रीच नॉर्किया दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज आहे आणि त्याची गती ही त्याची ताकत आहे. पण याच वेगवान गोलंदाजाला युवा रियानने हा जबरदस्त षटकार मारला. रियानने षटकार मारलेला हा चेंडू नॉर्कियाने १४३.४ किमी ताशी गतीने टाकला होता, पण फलंदाजाने यावर सहज षटकार मारला. रियानने ज्या सहजतेने हा ९२ मीटरचा षटकार मारला, ते पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या हे नक्की. अनेकजन रियानला भारतीय संघाचा भविष्यातील फिनिशर म्हणू लागले आहेत. त्याने मारलेल्या षटकाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://twitter.com/patidarfan/status/1524413565444444160?s=20&t=p91wgwMB8QG–ycIeNVcRg

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले, ज्यामुळे संघाला निर्धारीत १६० धावांवर समाधान मानावे लागले. रविचंद्रन अश्विनने राजस्थानसाठी सर्वाधिक ५० धावांचे योगदान दिले. गोलंदाजांमध्ये मिचेल मार्श, एन्रीच नॉर्किया आणि चेतन साकरीया यांनी प्रत्येकील दोन विकेट्स घेतल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

अश्विनची फलंदाजी ऍक्शन पाहून व्हाल लोटपोट, याआधी कधीही पाहिला नसेल असा बॅटिंग स्टान्स

अश्विन अण्णांनी दिल्लीला झोडले! १३१च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत पहिल्यांदाच ‘ही’ विक्रमी कामगिरी केली

सासवड एफसीचे जुन्नरविरुद्ध आठ गोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---