इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी डावाची सुरुवात करत आहे. बटलर आयपीएलच्या चालू हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत आणि संघासाठी त्याने महत्वपूर्ण प्रदर्शन केले आहे. शनिवारी (७ मे) पंजाब किंग्जसाठी देखील बटलर घातक ठरू शकत होता, पण वैयक्तिक ३० धावा करून त्याने विकेट गमावली. कागिसो रबाडाला हलक्यात घेतल्यामुळे बटलरने विकेट गमावली.
शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात हा सामना खेळला गेला. उभय संघातील या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्सने विजय मिळवला. सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) आणि यशस्वी जयसवालने राजस्थान संघाला चांगली सुरुवात करून दिली. बटलर अधिक मोठी खेळी करू शकत होता, पण त्याने स्वतःच्या चुकीमुळे विकेट गमावली. अवघ्या १६ चेंडूत त्याने ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राजस्थान रॉयल्सच्या डावातील चौथे षटक रबाडा घेऊन आला होता. बटलरने या षटकात रबाडाची चांगलीच धुलाई केली. रबाडाला बटलरने एखाद्या नवख्या गोलंदाजाप्रमाणे मारले खरे, पण षटकातील शेवटच्या चेंडूवर विकेट गमावली. रबाडाला या षटकात पहिल्या चेंडूवर बटलरने षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवर बटलरने कव्हरच्या दिशेने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर देखील फाइन लेगच्या दिशेने स्कूप खेळून चौकार मारला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर देखील त्याने मोठा शॉट खेळला, पण तो सीमारेषेपार जाऊ शकला नाही. या चेंडूवर बटलरने दोन धावा घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रबाडाच्या षटकातील पाचव्या चेंडूवर बटलरने पुन्हा एक चौकार मारला. एवढे करून देखील त्याचे समाधान झाले नाही, म्हणून शेवटच्या चेंडूवर देखील पुन्हा स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी त्याचा प्रयत्न फसला आणि शॉर्ट थर्ड मॅनवर उभा असलेल्या भानुका राजपक्षच्या हातून झेलबाद झाला. एकंदरीत पाहता रबाडाला हलक्यात घेतल्यामुळे बटलरला विकेट गमवावी लागली.
उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने ५ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावा केल्या. १९० धावांचे लक्ष्य राजस्थान रॉयल्सने ४ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.४ षटकात गाठले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुल सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, पाहा कोणी उधळलीत स्तुतीसुमने