---Advertisement---

इंग्लिश ते थेट हिंदी, इंग्लंडच्या खेळाडूने हिंदीमध्ये विचारले आयपीएलप्रेमींचे हाल-चाल; Video तुफान व्हायरल

On: शुक्रवार, मार्च 18, 2022 6:07 PM
Sam-Billings-Specking-Hindi
---Advertisement---

सध्या भारतात सर्वत्र इंडियन प्रीमियर लीगची रणधुमाळी सुरू आहे. २६ मार्च ते २९ मे दरम्यान भारतातील मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. त्यातही यंदा ८ ऐवजी १० संघ आयपीएलमध्ये खेळणार असल्यामुळे यंदाच्या हंगामाला अधिकच रंगत चढली आहे. या हंगामासाठी भारतीय आणि परदेशी खेळाडू आपापल्या फ्रँचायझीसोबत जोडले जात आहेत. २ वेळच्या आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचेही बरेचसे खेळाडू संघासोबत जोडले गेले आहेत.

दरम्यान कोलकाता संघाचा (Kolkata Knight Riders) भाग असलेला इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्स (Sam Billings) चक्क हिंदी बोलताना (Sam Billings Specking In Hindi) दिसला आहे. स्वत: कोलकाता संघाने त्याचा हिंदी बोलतानाा व्हिडिओ शेअर केला आहे.

मेगा लिलावात कोलकाता संघाने इंग्लंडच्या या क्रिकेटपटूला २ कोटींच्या मूळ किंमतीला विकत घेतले होते. बिलिंग्स आयपीएल २०२२ च्या (IPL 2022) हंगामासाठी मुंबईमध्ये आला असून तो सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. 

यादरम्यान कोलकाता संघाच्या एका व्हिडिओमध्ये बिलिंग्स आयपीएलप्रेमींशी बोलताना हिंदीमध्ये म्हणतो की, ‘तो कैसे हो आप लोग?’ 

कोलकाता संघाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओखाली चाहते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. 

https://www.instagram.com/reel/CbNPRiTlqqM/?utm_source=ig_web_copy_link

आयपीएलमध्ये बिलिंग्सची कामगिरी
बिलिंग्स कोलकातापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग राहिला आहे. त्याने आतापर्यंत २२ आयपीएल सामने खेळले असून १९ डावांमध्ये फलंदाजी करताना ३३४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ अर्धशतके निघाली आहेत. टी२० स्वरूपात बिलिंग्सकडे ३७ सामन्यांचा अनुभव आहे. यादरम्यान त्याने २ अर्धशतकांच्या मदतीने ४७८ धावा केल्या आहेत.

मागील हंगामाचा उपविजेता राहिलाय कोलकाता संघ
आयपीएल २०२१ च्या हंगामात कोलकाता संघ उपविजेता राहिला होता. भारतात खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात कोलकाता संघाने केवळ २ सामने जिंकले होते. परंतु युएईमध्ये झालेल्या दुसऱ्या टप्प्यात संघाने शानदार पुनरागमन केले आणि अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. परंतु चेन्नई सुपर किंग्ज संघाने अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचे पाणी पाजले होते. त्यामुळे त्यांचे तिसऱ्या विजेतेपदाचे स्वप्न भंगले होते.

यंदाच्या हंगामासाठी कोलकाता संघाने त्यांचा जुना कर्णधार इयॉन मॉर्गनला रिलीज केले आहे आणि त्याच्याजागी भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याच्याकडे नेतृत्त्वपद सोपवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

वडिलांच्या निधनाने खचलेल्या सिराजला टीम इंडियाच्या ‘या’ व्यक्तीने दिला होता आधार; स्वत: केला मोठा खुलासा

विंडीज गोलंदाजाने क्रिकेटमध्ये आणले नवे बेबी सेलिब्रेशन; मैदानातच व्हिडिओ कॉल करत म्हटले, ‘हाय बेबी’

वेंकटेश अय्यर आणि आवेश खानचा ‘हबिबो’ डान्स Video व्हायरल, थालापती विजयलाही दिली टक्कर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---